Lung health | फुफ्फुसाच्या घातक आजाराची ‘ही’ 5 लक्षणे, दुर्लक्ष करण्याची चूक करू नका; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Lung health | फुफ्फुसाच्या आजारासंबंधी पूर्व संकेत वेळीच ओळखले तर मोठे संकट टाळता येऊ शकते. न्यूट्रिशनिस्ट लवलीन बत्रा यांनी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये फुफ्फुसाची (Lung health) काही लक्षणे बारकाईने पाहण्याचा सल्ला दिला आहे. ही लक्षणे कोणती ते जाणून घेवूयात…

1. छातीत वेदना (Chest pain) –
एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त छातीत वेदना एखाद्या मोठ्या समस्येचा संकेत असू शकतो. विशेषता खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर दुर्लक्ष करू (Lung health) नका.

2. कफ (Cuff) –
छातीत कफ इन्फेक्शन आणि जळजळीपासून बचावाच्या रूपात एयरवेजद्वारे तयार होतो. जर एखाद्या मनुष्याच्या छातीत एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त दिवस कफची समस्या असेल तर हा एखादा आजार असू शकतो.

3. अचानक वजन कमी होणे (Sudden weight loss) –
कोणत्याही विशेष डाएट किंवा वर्कआऊटशिवाय मनुष्याचे वजन कमी होणे सामान्य बाब नाही. हे शरीरात वाढत असलेल्या ट्यूमरच्या धोक्याचे लक्षण असू शकते.

4. श्वासात बदल (Changes in breathing) –
जर श्वास घेण्यात अडचण येत असेल तरी सुद्धा लंग्ज डिसिजचे लक्षण असू शकते.
कारण फुफ्फुसात ट्यूमर किंवा कार्सिनोमामुळे तयार झालेले फ्लूड एयर पॅसेज ब्लॉक करते.
या कारणामुळे मनुष्याला श्वास घेण्यात अडचण येऊ शकते.

5. लागोपाठ खोकला किंवा खोकल्यातून रक्त (Subsequent coughing or coughing up blood) –
लागोपाठ 8 आठ आठवड्यापर्यंत खोकला किंवा खोकल्यातून रक्त सुद्धा मनुष्याची रेस्पिरेटरी सिस्टम खराब झाल्याचे दर्शवते.
अशावेळी ताबडतोब डॉक्टरांकडे जा, आणि उपचार करा.

Web Title :- Lung health | lung health 5 warning signs you should not ignore says nutritionist

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 134 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Uddhav Thackeray | संजय राऊतांचे ‘ते’ विधान अन् उद्धव ठाकरेंचे अमित शहांसोबत ‘लंच”, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Home Remedies of Cavity Pain | ‘कॅव्हिटी’च्या दुखण्यापासून पाहिजे असेल सुटका तर अवलंबा ‘हे’ 7 घरगुती उपाय, मिळेल आराम