कोरोना व्हायरस : Lupin नं लॉन्च केलं Covid-19 चं औषध Covihalt, किंमत फक्त 49, रूपये

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोविड-19 च्या सौम्य आणि कमी गंभीर रूग्णांच्या उपचारासाठी औषध क्षेत्रातील प्रमुख कंपनी ल्युपिन यांनी बुधवारी फेव्हपीरावीर या औषधाला ‘कोविहाल्ट’ ब्रँड नावाने लॉंच केले आहे. त्याच्या एका टॅब्लेटची किंमत 49 रुपये आहे. शेअर बाजाराला पाठविलेल्या नियामक माहितीत ल्युपिनने म्हंटले की, आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी फेव्हीपीरावीरला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडून परवानगी मिळाली आहे. असे म्हटले जाते की, कोविहाल्टमधील औषधाचे प्रमाण प्रशासनाच्या सोयी लक्षात घेऊन विकसित केले गेले आहे. ते म्हणाले की, 200 मिलीग्राम टॅब्लेटच्या रूपात 10 औषधाच्या स्ट्रीप स्वरूपात हे औषध उपलब्ध असेल. प्रत्येक गोळीची किंमत 49 रुपये ठेवली आहे.

ल्युपिनचे इंडियन रीजनल फॉर्म्युलेशन ( IRF) चे अध्यक्ष राजीव सिब्बल म्हणाले की, कंपनीला टीबीसारख्या संसर्गजन्य आजाराचा प्रसार झपाट्याने होण्याच्या क्षेत्रात मिळालेल्या अनुभवाचा फायदा घेता येईल. ते आपल्या मजबूत वितरण नेटवर्क आणि कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या कार्यबळाच्या जोरावर देशभरात कोविहाल्टची पोहोच सुनिश्चित असेल

सन फार्माने देखील लाँच केले कोरोना औषध फ्लूगार्ड

यापूर्वी सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजनेही ‘फ्लूगार्ड’ या ब्रँड नावाने फेवीपिरवीर लाँच केले. त्याने एका टॅब्लेटची किंमत 35 रुपये ठेवली आहे. दरम्यान, एव्हिफावीर सामान्यतः फेव्हपीरावीर म्हणून ओळखले जाते. हे औषध सर्वप्रथम 1990 मध्ये जपानी कंपनीने बनवले होते.