मुकेश अंबानींच्या ‘रिलायन्स’ची सराफा बाजारात ‘एन्ट्री’, ‘या’ परदेशी कंपनीशी ‘करार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील सर्वात श्रीमंत उद्योग समूह असलेल्या रिलायन्स लवकरच भारतात टिफनी एंड हा नवीन ब्रँड आणणार आहे. माध्यमांमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार रिलायन्स आणि टिफनी या कंपनीने संयुक्तपणे नवीन उद्योग सुरु करण्याची घोषणा केली आहे. टिफनी देशभरात रिलायन्सच्या मदतीने अमेरिकन दागिन्यांचे एक लग्जरी दालन उघडणार आहे. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे कि, २०१९-२०२० या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत दिल्लीमध्ये हे दालन उघडले जाणार असून लवकरच याची कार्यवाही केली जाणार आहे.

टिफनी कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष फिलिप गलटी यांनी याविषयी बोलताना सांगितले कि, जगभरातील सर्वात मोठे दागिन्यांचे दालन असणाऱ्या या कंपनीचे भारतात देखील दालन उघडण्याचा आम्ही निर्णय घेतला असून भारतातील नागरिकांना देखील याचा उपभोग घेण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे.

टिफनीला भारतात कोणत्याही ओळखीची गरज नाही
रिलायन्स ब्रॅंड्सचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन मेहता यांनी सांगितले कि, टिफनीला भारतात कोणत्याही ओळखीची गरज नसून टिफनीच्या शानदार ज्वेलरी कलेक्शनला भारतात आणण्यासाठी कटिबद्ध आहोत. याआधी रिलायन्सने मे महिन्यात ब्रिटनची खेळणी बनवणारी कंपनी हेमलेज देखील खरेदी केली होती.

आरोग्यविषयक वृत्त