क्रिकेटर क्रुणाल पांड्याकडे सापडली घड्याळं-सोनं, जाणून घ्या किती ड्यूटी चुकवल्यानंतर सुटला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेटर क्रुणाल पांड्याला काही दिवसांपूर्वी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर अडवण्यात आले होते. डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलीजन्सने त्याची काही तास चौकशी केली होती, ज्या दरम्यान क्रुणालकडून काही महागडी घड्याळे जप्त करण्यात आली. ऑडेमार्स पिग्यूट आणि रॉलेक्स ब्रँडच्या या तीन घड्याळांची किंमत एक कोटी रुपये सांगितली जात आहे. क्रुणालने याविषयी माहिती दिली नसल्याने त्याला 38.5 टक्के ड्यूटी म्हणजे 38 लाख रुपये भरावे लागले.

क्रुणालने चौकशीदरम्यान मान्य केले की, त्याला या नियमाबाबत माहीत नव्हते. आणि त्याने पेनल्टी भरण्याची बाबसुद्धा मान्य केली. सोबतच त्याने हेसुद्धा म्हटले की, तो यापुढे अशी चूक करणार नाही. यानंतर डीआरआयने त्यास जाऊ दिले, तर क्रुणालला मुंबई एअरपोर्टवर अवैध सोन्यासह रोखल्यानंतर सोशल मीडियावर तो खूप ट्रोल होत आहे. क्रिकेट फॅन्स वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स बनवून यावर खूप मजा घेत आहेत.