‘लिची’ खाण्याचे 9 आरोग्यदायी फायदे !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   मुळचं दक्षिण चीनमधील लिची हे फळ अनेकांना आवडतं. खायला गोड, रसाळ आणि जिभेला थंडावा देणारं असं हे फळ आहे. याला गुलाबी रंगाचं कवच आणि आत पांढरा रसाळ गर असतो. भारतात हे मे ते ऑक्टोबरमध्ये बाजारात मुबलक प्रमाणात आढळते. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये याची सर्वाधिक लागवड केली जाते. आज आपण याचे फायदे जाणून घेणार आहोत.

1) लिचीमध्ये कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, आयर्न आणि मिनरल्स असे पोषक घटक असतात. यामुळं शरीर स्वस्थ राहण्यास मदत होते.

2) लिची हे शक्तीवर्धक, रक्ताभिसरण वाढवणारं, रक्ताशी निगडीत विकार दूर करणारं फळ आहे.

3) लिचीमधील रासायनिक गुणधर्मांमुळं पचनक्रिया सुधारते

4) निद्रानाशाची समस्या दूर होते.

5) भारतात लिचीच्या बी पासून तयार केलेला चहा वेदनाशमक म्हणून वापरला जातो.

6) लिचीत पोटॅशियम आणि तांबे ही खनिजे जास्त असतात. यामुळं हृदयविकार आणि यकृताच्या आजारांसाठी याचा खूप फायदा होतो.

7) लिचीला त्वचेला खास दोस्त मानलं जातं. याचे कारण म्हणजे यातील ओलीगोनॉल रसायन आहे. या रसायनामुळं सुर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून त्वचेचं संरक्षण होतं.

8) यानं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

9) वजन कमी करायचं असेल तर सकाळी लिची हे फळ खावं यामुळं पोट भरल्यासारखं वाटतं आणि भूक कमी लागते.

कुणी खाऊ नये लिची ?

– लिची हे फळ गोड असतं त्यामुळं ज्यांना मधुमेह आहे त्यांनी याचं सेवन करून नये.

– सकाळी उपाशीपोटी या फळाचं सेवन करू नये.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.