बॉलिवूडमधील दिग्गज ‘गीतकार’ अनवर सागर यांचं मुंबईत 70 व्या वर्षी निधन !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील दिग्गज गीतकार अनवर सागर यांचं 70 व्या वर्षी निधन झालं आहे. बुधवारी (दि 3 जून 2020) त्यांना मुंबईतील एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. इथंच त्यांनी अखेरचा श्वसा घेतला. त्यांच्या निधनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. परंतु इंडियन परफॉर्मिंग राईट सोसायटी लिमिटेडनं गीतकार अनवर सागर यांचं निधन झाल्याची माहिती देत ट्विट केलं आहे आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

इंडियन परफॉर्मिंग राईट सोसायटी लिमिटेडनं ट्विट केलं आहे की, “अनुभवी गीतकार आणि आयपीआरएसचे सदस्य राहिलेले अनवर सागर यांचं आज निधन झालं आहे. वादा रहा सनम सारखी गाणी लिहिण्यासाठी ते ओळखले जातात. विजयपथ आणि याराना अशा अनेक सिनेमांसाठी त्यांनी गाणी लिहिली आहेत. आमच्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.”

अनवर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अनवर यांनी अक्षय कुमार आणि आयशा जुलका यांच्या खिलाडी सिनेमात वादा रहा सनम, अजय देवगण आणि तब्बू स्टारर विजयपथ आणि याराना अशा अनेक सिनेमाांसाठी गाणी लिहिली आहेत. वादा रहा सनम या गाण्यानं त्यांना खूप ओळख दिली. 90 च्या काळातील हे गाणं आजही खूप पसंत केलं जातं. त्यांच्या लोकप्रिय गाण्यांच्या यादीत या गाण्याचाही समावेश आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like