एम फिटनेस अ‍ॅन्ड योगा थेरपी आणि सार्थक हॉलिस्टीक हेल्थकेअर सेंटरकडून पारंपरिक वेषातील महिलांचा योगासनातून आरोग्य जागर

पुणे:गोमुखासन…स्वस्तिकासन…चक्रासन…पतंगासन…भुजंगासन…नौकासन…गरुडासन…विरासन…यांसह रोप नौकासन आणि रोप शिर्षासन करीत केवळ शरीरासाठी नाही तर मन आणि बुद्धीसाठी योगाचे महत्त्व सांगण्यात आले. नऊवारी साडीत योगासने करुन महिलांच्या आरोग्याचा जागर यावेळी करण्यात आला.

एम फिटनेस अ‍ॅन्ड योगा थेरपी आणि सार्थक हॉलिस्टीक हेल्थकेअर सेंटर यांच्या वतीने महिलांसाठी योग आणि योग्य आहार याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनाली मगर- कदम, सोनाली मगर-मोरे, डॉ. सुनील ठिगळे, डॉ. हेमा ठिगळे उपस्थित होते.

सोनाली मोरे म्हणाल्या, योगा सतयुगापासून चालू आहे. योगा म्हणजे फक्त आसन न्हवे ,तर आपली जीवनशैली कशी असावी याचे सूत्र म्हणजेच योग सूत्र. केवळ शरीरानेच नाही तर मनाने ,बुद्धीने देखील निरोगी राहण्यास योगातून साध्य होते.

वर्षभर लॉकडाऊनमुळे घरातली महिला सतत काम करीत होती. तीला कधी सुट्टी मिळाली नाही. त्यामुळे महिलांना स्वत:कडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण सततच्या कामामुळे मणक्याचे मानेचे आजार ,मानसिक आजार ,हॉर्मोनचे प्रॉब्लेम वाढत आहेत या साठी महिलांनी योगाकडे वळण्याची गरज आहे.