राष्ट्रवादी ज्येष्ठ नागरिक सेल पुरंदर तालुका अध्यक्षपदी एम. के. गायकवाड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हिवरे (ता. पुरंदर) येथील राष्ट्रवादी सरपंच संघटनेचे माजी अध्यक्ष व पुरंदर तालुका खरेदी -विक्री संघाचे माजी सभापती एम. के. उर्फ मारुती कोंडीबा गायकवाड यांची पुरंदर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष बापूसाहेब चौधरी यांनी दिले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस श्री. कड, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब कटके, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव टकले, कुंभारवळणाचे माजी सरपंच सोमनाथ खळदकर, संपत शेडगे आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच बापूसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात ज्येष्ठ नागरिक संघटना बळकट करण्याचे काम केले जाईल असे एम. के. गायकवाड यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like