एम. करूणानिधी व्हेंटिलेटरवर; अनेक नेत्यांनी घेतली भेट 

चेन्नई : वृत्तसंस्था

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम करुणानिधी  यांची प्रकृती मंगळवारी आणखीनच खालावली आहे. रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना शनिवारी कावेरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. करुणानिधी ९४ वर्षाचे असून त्यांना मूत्रपिंडाचा त्रास आहे. कावेरी हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टम (व्हेंटिलेटर) वर ठेवण्यात आले असल्याची माहिती कावेरी हॉस्पिटलच्या सुत्रांनी दिली असून, डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर सतत लक्ष ठेऊन आहेत.
[amazon_link asins=’B00VHZ53E0′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ef31f3d1-9a41-11e8-95e4-75b1e6388999′]
करुणानिधी  यांच्याबाबत हॉस्पिटलचे कार्यकारी निर्देशक डॉक्टर अरविन्दन सेल्वाराज म्हणाले की, पुढील २४  तास हे त्यांच्या प्रकृतीसाठी किती सुधारणा होणे महत्तवाचे आहे. २८ जुलै रोजी त्यांचा रक्तदाब वाढल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सद्या त्यांचे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आहे. मात्र ,त्यांची प्रकृती जास्त खालावली. करुणानिधी यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करण्यासाठी डीएमकेच्या मुख्यालयाबाहेर आणि कावेरी हॉस्पिटलसमोर डीएमकेच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर करूणानिधींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी राज्यभर प्रार्थना करत आहेत.

अनेक नेत्यांनी केली विचारपूस
आज सकाळपासून अनेक महत्वाच्या नेत्यांनी करूणानिधींच्या प्रकृतीची हॉस्पिटलमध्ये जावून विचारपूस केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम.के.स्टॅलिन यांना फोन करून करूणानिधींच्या प्रकृतींच्या तब्येतीची विचारपूस केली. तर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, द्रमुक के कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टालिन यांनी चेन्नईतल्या हॉस्पिटलमध्ये जावून विचारपूस केली. दरम्यान संध्याकाळी करूणानिधी यांच्या सर्व कुटूंबियांना हॉस्पिटलमध्ये बोलावण्यात आले होते . वय जास्त झाल्याने औषधोपचारही फारसा प्रतिसाद देत नसल्याने डॉक्टरांच्या चिंता वाढल्या आहेत. काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनीही हॉस्पिटलमध्ये जावून करूणानिधींच्या प्रकृतीची विचारपूस केली.