MS धोनीच्या निवृत्‍तीच्या बातमी संदर्भात निवड समितीच्या अध्यक्षांचा मोठा खुलासा, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कॅप्टन कुल आणि ऑलराउंडर विकेटकीपर एमएस धोनी हा क्रिकेटमधून कायमचा संन्यास घेणार असल्याची बातमी सोशल मीडियावरून वाऱ्यासारखी पसरली आहे. आज संध्याकाळी सात वाजता धोनी पत्रकार परिषद घेऊन क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार असल्याचे वृत्त शेअर झाल्या होत्या. या बातमीमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनी धोनीच्या निवृत्तीचं वृत्त खोट असल्याचे सांगितले आहे. धोनीच्या निवृत्तीविषयी आमच्याकडे काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सोशल मीडियावर व्हायरल होणारे वृत्त चुकीचं असल्याचे त्यांनी सांगितले.

विराट कोहली याने ट्वीट केलेला एक फोटो पाहून चाहत्यांनी आणि क्रिकेट रसिकांनी धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू केली. गुरुवारी विराटने केलेल्या ट्विटमध्ये एक फोटो ट्विट केला आहे. त्यात तो धोनीपुढे झुकून त्याचा सन्मान करत असल्याचे दिसत आहे. या माणसाने त्या दिवशी मला अस काही धावायला लावलं होत की मी फिटनेस टेस्ट देत होतो जणू… स्पेशल नाईट… त्या दिवशीचा खेळ मी कधीच विसरणार नाही, असे ट्विटमध्ये म्हटले होते.

विराटच्या ट्विटमुळे धोनीच्या चाहत्यांनी वेगवेगळा अर्थ काढण्यास सुरुवात केली. धोनीच क्रिकेटमधील योगदान, माजी कॅप्टनचा हातखंडा, त्याच कौशल्य अस अचानक कौतुक विराट करतोय म्हणजे धोनीकडून काही मोठी बातमी येऊ शकते अशी अटकळ धोनीच्या चाहत्यांकडून सुरु झाली.

You might also like