2020 मध्ये कोणावर होणार माता लक्ष्मीची कृपा ? ‘या’ 3 राशींच्या लोकांवर ‘धन’वर्षाव !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – तीन अशा राशी आहेत, ज्यांच्यावर 2020 सालात लक्ष्मी मातेची सर्वात जास्त कृपा होणार आहे. व्यवसाय व नोकरी करणार्‍यांच्या हातात पैसा टिकणार असून उत्पन्नाचे नवे मार्गही सापडणार आहेत. लक्ष्मी मातेच्या कृपेने कोणत्या जातकांच्या घरात धन-धान्याची भरभराट होणार आहे, ते जाणून घेवूयात.

मेष
धनलाभाची स्थिती उत्तम आहे. व्यवसायातील समस्या संपतील. नवीन व्यापार करताना सावधगिरी बाळगा. नोकरदारांसाठी बढतीचे योग आहेत. लक्ष्मी मातेच्या कृपेने उत्पन्नाचे दुसरे मार्ग सापडतील.

वृषभ
व्यवसायतील स्थितीमध्ये हळूहळू सुधारणा होईल. अचानक धनलाभाची अपेक्षा करू नका. कर्ज घेताना-देताना सावधगिरी बाळगा. नोकरीच्या बाबतीत थोडा संघर्ष करावा लागेल

मिथुन
या वर्षात व्यवसायात स्थिरता येईल. नवीन व्यवसायाच्या बाबतीत विचार करू शकता. भागीदारीचा निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. नोकरीच्याबाबतीत स्थिती साधारण राहील.

कर्क
वर्षाच्या सुरूवातीला व्यवसायात थोड्या समस्या आहेत, पण मे मध्ये कामाच्या स्थितीमध्ये सुधारणा होईल. व्यवसायातील समस्या हळूहळू कमी होत जातील. वर्षाच्या शेवटी लक्ष्मीमातेच्या कृपेचा वर्षाव होऊ शकतो.

सिंह
या वर्षात रोजगाराबाबत मोठा निर्णय घ्याल. व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा विचार करू शकता. विनाकारण कर्ज घेण्याच्या भानगडीत पडू नका. नोकरी बदलण्याचे, बढतीचे योग या वर्षात कमी दिसत आहेत.

कन्या
नव्या व्यवसायासोबत नवीन वर्षाची सुरूवात होऊ शकते. बदल करण्यासाठी चिंता करू नका, जोखीम घेऊ शकता. यामुळे व्यवसायात सुधारणा होऊ शकते.

तुळ
व्यवसायातील सर्व अडचणी दूर होतील. या वर्षात नवीन व्यवसाय लाभदायक ठरू शकतो. यामध्ये वडील अथवा कुटुंबाकडून सहकार्य मिळू शकते. लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावरही सतत असणार आहे. लक्ष्मी मातेची उपासना केल्यास उत्पन्नाचे मार्ग वाढतील.

वृश्चिक
व्यापारातील समस्या हळूहळू दूर होतील. कर्ज फेडणे शक्य होईल. व्यापाराची स्थिती चांगली राहील, समस्या संपतील. नोकरीत 2019 च्या तुलनेत चांगले काम कराल.

धनु
सध्या व्यवसायात कष्ट करण्याची गरज आहे. नवीन व्यवसाय करू शकता, पण मोठी गुंतवणूक करू नका. या वर्षात बुडलेले पैसे काढण्याचा प्रयत्न करा. संपत्तीमध्ये गुंतवणूक करताना मोठ्यांचा सल्ला जरूर घ्या.

मकर
यावर्षी व्यवसायात बदल करू नका. कर्ज घेणे तसेच संपत्ती खरेदी करताना सावधगिरी बाळगा. व्यवसायाच्या स्थितीत हळूहळू सुधारणा होईल. नोकरदारांनीही सावधगिरीने काम करण्याची गरज आहे.

कुंभ
व्यवसायात या वर्षी थोडी मंदी जाणवेल. परंतु, एकुणच स्थिती नियंत्रणात राहील. व्यवसायातील सुधारणांचा विचार करू शकता. घरातील आर्थिक चणचण दूर होईल, तसेच हातात आलेला पैस टिकेल.

मीन
या वर्षात व्यवसायात बदल करण्याचे मोठे योग आहेत. जर सध्याच्या व्यवसायात काही बदल करू इच्छित असाल तर लाभ होईल. परंतु, भागीदारी करताना सावधगिरी बाळगा. गुंतवणूक करणे टाळा.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like