फॅशन लेबलनं केलं ‘बॉडी शेमिंग’, अ‍ॅक्ट्रेस मानवी गागरूनं फटकारल्यानंतर लेबलनं मागितली ‘माफी’ !

अ‍ॅमेझॉन प्राईमवरील फोर मोर शॉट्स प्लिज या वेब सीरिजमधील अ‍ॅक्ट्रेस मानवी गागरू हिनं एका फॅशन लेबलला फॅट शेमिंगवरून चांगलंच सुनावलं आहे. एका फॅशन लेबलनं मानवीचा फोटो जाहिरातीसाठी वापरला होता. यात तिनं धोतर कुर्ता घातला होता. याची टॅगलाईन अशी होती की, या स्टाईलनं आपल्या लठ्ठपणाला असं लवपलं आहे.

मानवीनं फॅशन लेबलचा घेतला समाचार
फॅट शेमिंग फोटोचे स्क्रीनशॉट्स काढून ट्विटरवर शेअर करत मानवीनं लिहिलं होतं की, मी हा ड्रेस माझा लठ्ठपणा लपवण्यासाठी नव्हता घातला. या ब्रँडकडे माझा फोटो वापरण्याची परवानगीही नाही आणि कोणाला फॅट शेम करण्याचा अधिकारही नाही. मी या बातमीच्या आणि टॅगलाईनच्या विरोधात आहे.

फॅशन लेबलनं मागितली माफी
फॅशन लेबलनं मानवीची माफी मागितली आहे. लेबलनं लिहिलं की, “आम्ही या गोष्टीसाठी दिलगीर आहोत की, आमच्या ब्रँडनं सेलिब्रिटीच नाही तर बॉडी शेमिंग आणि बॉडी पॉझिटीव्हिटीवरही चुकीचा मेसेज दिला आहे. आम्ही प्रत्येक प्रकारच्या शेमिंगविरोधात आहोत, मग ते सोशल मीडियावर असो किंवा त्याबाहेर असो. ही आमच्या लेबलकडून झालेली एक चूक होती. यासाठी आम्ही मागत आहोत. जाहिरात हटवण्यात आली आहे.”

https://www.instagram.com/p/CAvIv9fJH5v/?utm_source=ig_embed

यानंतर मानवीनं पुन्हा एक ट्विट केलं आणि हे प्रकरण इथंच मिटलं असं सांगितलं. सोबतच पुन्हा असं होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली.