पाकिस्तानच्या झेंड्यासोबत माचीस आणि लायटर फ्री

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून सीआरपीएफ जवानांच्या वाहनावर भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. या हल्ल्याचा निषेध देशभरात व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानकडून या हल्ल्याचा बदला घायलाच पाहिजे अशी भावना नागरीकांच्या मनात आहेत. देशभरात ठिठिकाणी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कुठे पाकिस्तानचे प्रतिकात्मक पुतळे आणि झेंडे जाळले जात आहेत. तर कुठे पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत. पण पुण्यातील एका झेंडे विक्रेत्याने चक्क पाकिस्तानच्या झेंड्याबरोबर माचीस आणि लायटर मोफत देण्याची स्कीम सुरु केली आहे या झेंडेवाल्याचा व्हीडिओ सोशलमीडियावर भलताच व्हायरल होतो आहे.

पुण्यातील प्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाल्यानी ही स्कीम सुरू केली आहे. गेल्या तीन पिढ्यांपासून पुण्यात मुरुडकर झेंडेवाले, झेंडे विक्री करण्याचा व्यवसाय करीत आहेत. पण गेल्या तीन पिढयात जेवढे पाकिस्तानचे झेंडे विक्री झाले नाहीत तेवढे आता होत आहेत अशी प्रतिक्रिया पुण्यातील मुरुडकर झेंडे विक्रेत्यांनी केला आहे.

काय आहे व्हिडीओ

या व्हिडिओत मुरुडकर झेंडे विक्रेते म्हणतात ” पाकिस्ताच्या मदतीने दहशतवाद्यांनी जे कृत्य केलं आहे. त्याबाबदाल भारतीयांच्या मनात प्रचंड संताप आहे. तो व्यक्त करण्यासाठी आज तरी फक्त सामान्य नागरिकांकडे पाकिस्तानचा झेंडा आहे. गेल्या तीन पिढ्यांना आम्ही झेंडे देतोय पण आजच्या इतकी पाकिस्तानच्या झेंड्याला मागणी कधीच नव्हती. राग युंवकांच्याही मनात आहे आणि राग आमच्याही मनात आहे. म्हणूनच प्रत्येक झेंड्याबरोबर आम्ही लायटर आणि माचीस फ्री देतोय. हे फक्त प्रतीक आहे आमच्या भावना पाकिस्तानपर्यंत पोहचवण्यासाठी” अशी भावना मुरूमकर झेंडे विक्रेत्यांनी या व्हिडिओतून व्यक्त केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like