नवी दिल्ली : Rail Madad App | भारतीय रेल्वे प्रवाशांचा प्रवासाचा अनुभव चांगला बनवण्यासाठी रेल्वेने आता एक नवीन अॅप सुरू केले आहे. प्रवासात काही समस्या आली तर प्रवाशांना ‘रेल मदत अॅप’ (Rail Madad App) द्वारे तक्रार करता येईल. प्रवाशांच्या समस्या आणि तक्रारी सोडवण्यासाठी रेल्वेने हे अॅप बनवले आहे. कारण प्रवाशांना समजत नाही की प्रवासादरम्यान निर्माण झालेली समस्या कुठे मांडावी.
इंटरनेटच्या जमान्यात आता रेल्वेपर्यंत आपली तक्रार पोहचवणे अतिशय सोपे आहे. प्रवासी ‘रेल्वे मदत अॅप’ वर जाऊन आपला तिकिट नंबर टाकून तक्रार करू शकतात. प्रवासादरम्यान प्रवाशी पाणी, वीज आणि स्वच्छतेबाबत तक्रार दाखल करू शकतात.
तसेच तुम्ही कोणत्याही प्रकारची तक्रार याद्वारे करू शकता. जर तुम्हाला रेल्वेच्या एखाद्या कर्मचार्याच्या वर्तणुकीबाबत किंवा कामाबाबत तक्रार करायची असेल तरीसुद्धा तुम्ही Rail Madad App ची मदत घेऊ शकता.
तक्रार करण्यासाठी तुम्हाला एक ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल ज्यामध्ये तक्रारीसंबंधी डिटेल, घटनेची तारीख, कर्मचार्याचे नाव, घटनास्थळ इत्यादीबाबत माहिती द्यावी लागेल.
फॉर्ममध्ये पर्सनल डिटेल्स, जसे की नाव, मोबाइल नंबर, ई-मेल, पत्ता इत्यादी माहिती देणे आवश्यक आहे.
तुम्ही यामध्ये तक्रार सविस्तर प्रकारे लिहू शकता. सोबतच आवश्यक डॉक्युमेंटसुद्धा अटॅच करावे लागतील