‘मॅडम चीफ मिनिस्टर’ला मिळाली जीवे मारण्याची धमकी, स्वरानं म्हटलं ही ‘लाजिरवाणी’ बाब

पोलीसनामा ऑनलाईन : अभिनेत्री रिचा चड्ढाचा आगामी चित्रपट ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ विषयी बरीच चर्चा होत आहे. चित्रपटाचा ट्रेलरही ट्रेंड करत आहे आणि चित्रपटाविषयी गदारोळही होताना दिसत आहे. ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ या चित्रपटामुळे दलित समाजातील काही लोक खूप नाराज असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांच्या दृष्टीने चित्रपटात दलितांची जी भूमिका मांडण्यात आली आहे ती अपमानजनक आहे.

इतकेच नाही तर चित्रपटाच्या एका पोस्टरबाबत देखील बराच गोंधळ उडाला आहे. या सर्व प्रकारामुळे रिचा चड्ढाला जीवे मारण्याच्या धमक्या देखील मिळत आहेत. दरम्यान अशा काही बातम्या समोर येत आहेत की जिथे रिचाविरूद्ध प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. तिला गोळी मारण्यात येईल असे देखील बोलले जात आहे. रिचाने स्वत: एका मुलाखतीत याबद्दल सांगितले आहे.

ती म्हणते की, काही लोक म्हणतात की ते पोस्टर जाळतील, काचा फोडतील, मला देखील अशा प्रकारच्या धमक्या मिळत आहेत. गोळीने मारण्याचे देखील बोलले जात आहे. मला वाटते की हा विरोध आपल्या इंडस्ट्रीचा भाग झाला आहे. तसे तर रिचाने वादग्रस्त पोस्टरबद्दल माफी मागितली आहे, परंतु तरीही लोकांचा संताप कमी होत नाही. दरम्यान, आता अभिनेत्री स्वरा भास्करने रिचा चड्ढाच्या बाजूने उभे राहून तिचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.

ज्याने अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे अशा प्रत्येक व्यक्तीला तिने लक्ष्य केले आहे. स्वराने ट्विट करुन लिहिले की, हे तर लज्जास्पद आहे आणि याचा निषेध झाला पाहिजे. आपल्याला एखाद्याच्या विचारसरणीमुळे समस्या होऊ शकते, परंतु कुणाला हिंसा करण्यास उद्युक्त करणे हा गुन्हा आहे.

 

 

 

https://publish.twitter.com/?url=https://twitter.com/ReallySwara/status/1350698106518700032

 

 

 

स्वराने पुढे लिहिले की, जेवढेही आंबेडकरवादी आणि दलित फेमिनिस्ट आहेत, त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन याविरोधात बोलले पाहिजे. आता स्वराच्या अपीलने हा वाद कितपत थंड होईल, हे पाहण्यासारखे ठरेल.