अन्यथा टिकटॉकवर लावण्यात आलेली बंदी काढून टाकण्यात येईल : सर्वोच्च न्यायालय

वृत्तसंस्था : पोलीसनामा ऑनलाइन – २४ एप्रिल पर्यंत टिकटॉक अ‍ॅपवर विचार करून निर्णय देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्ययालयाला मुदत दिली आहे. २४ एप्रिल पर्यंत अंतिम निर्णय देण्यात नाही आला तर त्यावर लावण्यात आलेली बंदी काढून टाकण्यात येईल. असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले आहे.

टिक टॉक च्या व्हिडीओजने सोशल माडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. भारतात काही ठिकाणी या अ‍ॅपच्या माध्यमातून अश्लिल मजकूर अपलोड होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तात्काळ या अ‍ॅपवर बंदी आणण्यासाठी मद्रास हायकोर्टाकडून याचीका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर मद्रास हायकोर्टाने अ‍ॅपवर बंदी आणली. या बंदीविरोधात सुप्रीम कोर्टात अपील करण्यात आले.

सुप्रीम कोर्टाने बंदीवर स्थगिती आणण्यास नकार दिला असून पुढील सुनावणी २२ एप्रिल रोजी होणार होती. मात्र आज होणार असलेल्या सुनावणीतही त्या संदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्ययालयाला २४ एप्रिल पर्यंत टिकटॉक अ‍ॅपवर विचार करून निर्णय देण्यास मुदत दिली आहे. अन्यथा त्यावर लावण्यात आलेली बंदी काढून टाकण्यात येईल. असेही सांगण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, अ‍ॅड.अभिषेक मनू संघवी यांनी सांगितले की, त्यांचे व तज्ज्ञांचे म्हणणे ऐकल्याशिवाय निर्णय घेतले जाणार नाहीत. तसेच पुढील दोन दिवसांमध्ये उच्च न्ययालयाने टिकटॉक अ‍ॅपवर विचार करून निर्णय दिला नाही तर, त्यावर लावण्यात आलेली बंदी काढून टाकण्यात येणार आहे.