मॅडम प्रियंका वॉन्टेड… इमोशनल ब्लॅकमेलर, काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात खळबळजनक पोस्टरबाजी 

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन  – मॅडम प्रियंका वाड्रा लापता … इमोशनल ब्लॅकमेकर…  काँग्रेसचा बालेकिल्ला रायबरेलीतच हा आरोप  प्रियंका गांधी-वाड्रा यांच्यावर एका पोस्टरच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या पोस्टरने सध्या रायबरेलीत धुमाकूळ घातला आहे. ऐन लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना हे पोस्टर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचे कारण ठरले आहे. विशेष म्हणजे आगामी लोकसभेकरिता प्रियंका गांधींचे नाव पुढे येत आहे असे असताना देखील प्रियंका यांनी मतदार संघाकडे पाठ फिरवली आहे. त्यांचे मतदारसंघाकडे असलेले दुर्लक्ष पाहता ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

हे पोस्टर उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघात एका रात्रीत झळकले आहे आणि त्याची चर्चा आता सुरू आहे.  प्रियंका यांच्या शेवटच्या दौऱ्यानंतर रायबरेली अनेक दुर्घटना घडल्या. मात्र, काँग्रेसच्या बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघाला भेट देणेही प्रियंका यांना जमले नाही.

जाहिरात
असे आहे पोस्टर –
‘अँखिया थक गयी पंथ निहार, आजा रे परदेशी बस एक बार’, असे म्हणत प्रियंका यांना टार्गेट करण्यात आले आहे. प्रियंका या केवळ मतं मिळविण्यासाठी रायबरेलीतील लोकांच्या भावनांशी खेळतात असा आरोप करत, प्रियंका गांधी रायबरेलीत कधी येणार ? असा प्रश्नही या पोस्टर्सच्या माध्यमातून स्थानिकांनी विचारला आहे. या पोस्टर्संना शहरातील प्रमुख मार्गांवर, स्थानिक बाजारपेठांमध्ये आणि अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवरील भिंतींवर चिकटवण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी या पोस्टरबाजी करणाऱ्यांना ‘गंदी हरकत’ असे संबोधले आहे. तसेच ही पोस्टरबाजी म्हणजे विरोधकांचे कटकारस्थान असल्याचेही स्थानिक काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.