‘श्रीदेवी’चा वॅक्स ‘स्टॅच्यू’ सादर ! चाहते म्हणाले, ही आमची श्रीदेवी नाही !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – श्रीदेवी बॉलिवूडमधील एक असे व्यक्तीमत्व होते जिचे चाहते देशाविदेशात होते. त्यांच्या दमदार अभिनयामुळे त्यांची बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख होती. आता या श्रीदेवींच्या वॅक्स स्टॅच्यूचे 4 सप्टेंबरला सिंगापूरच्या मॅडम तूसाद या म्यूझिअममध्ये उद्घाटन करण्यात आले. परंतू हा स्टॅच्यू पाहून चाहते मात्र नाराज झाले.
जाह्नवी ने वैक्स स्टैच्यू का अनावरण किया, फैन्स बोले- ये हमारी श्रीदेवी नहीं
श्रीदेवीच्या वॅक्स स्टॅच्यूचे उद्घाटन त्यांचे पती बोनी कपूर आणि त्यांच्या दोन मुली जान्हवी आणि खूशीने केले. श्रीदेवीच्या चाहत्यांसाठी ही गर्वाची बाब आहे की श्रीदेवीचा वॅक्स स्टॅच्यू तयार करण्यात आला.

श्रीदेवीचे हे वॅक्स म्यूझिअममधील फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने श्रीदेवीचे चाहते खूप आनंदीत आहेत परंतू काहींनी यावर नाराजी देखील वर्तवली. अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे की श्रीदेवींचा स्टॅच्यू श्रीदेवीपेक्षा खूप वेगळा दिसतो.
जाह्नवी ने वैक्स स्टैच्यू का अनावरण किया, फैन्स बोले- ये हमारी श्रीदेवी नहीं
चाहत्यांच्या प्रतिक्रिया –
एका यूजरने सोशल मिडियावर लिहिले की, फक्त कपडे आणि फिगरवर लक्ष देण्यात आले आहे, चेहरा मात्र श्रीदेवीसारखा नाही.
जाह्नवी ने वैक्स स्टैच्यू का अनावरण किया, फैन्स बोले- ये हमारी श्रीदेवी नहीं
एका यूजरने लिहिले की, हा स्टॅच्यू श्रीदेवीसारखा दिसतच नाहीत. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलेले की, लवकरात लवकर हा स्टॅच्यू बदला, कारण हा श्रीदेवी सारखा दिसत नाही.
जाह्नवी ने वैक्स स्टैच्यू का अनावरण किया, फैन्स बोले- ये हमारी श्रीदेवी नहीं
एका यूजरने कमेंट केली ही हा स्टॅच्यू श्रीदेवीसारखा नाही आयशा टाकिया सारखा दिसतो.

बर्थ एनिवर्सरीनिमित्त सिंगापूरच्या मॅडम तूसादमध्ये श्रीदेवीच्या वॅक्स स्टॅच्यू तयार करण्याची घोषणा केली होती. म्यूझिअमकडून सांगण्यात आले होती की, बॉलिवूड आयकॉनचा सन्मान म्हणून आम्ही श्रीदेवींचा स्टॅच्यू सप्टेंबरच्या सुरुवातीला सादर करणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त