‘हे सराकर आहे की ईस्ट इंडिया कंपनी ?, आशिष शेलारांचा ‘सवाल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यंगचित्र काढणारे माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केली. या प्रकरणामुळं भाजपनं शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला होता तसेच राज्यातील आघाडी सरकारवर टीका केली होती. यानंतर पुन्हा एकदा भाजपनं टीकास्त्र सोडलं आहे. भाजपचे आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईचा दाखला देत राज्यातील सरकारला ईस्ट इंडिया कंपनी म्हणून हिनवलं आहे.

मदन शर्मा कांदिवली इथं राहतात. माजी नौदल अधिकारी असलेल्या मदन शर्मा यांना घरात घुसून शिवसैनिकांनी मारहाण केली. यानंतर या प्रकरणी 4 शिवसैनिकांना अटक झाली आहे. त्यांना जामीन मिळाला आहे. यात 2 शाखाप्रमुखांचा तर अन्य 2 कार्यकर्त्यांचा समावेश होता. शिवसैनिकांच्या सुटकेनंतर भाजपनं यावर आक्षेप घेतला आहे.

आशिष शेलार म्हणाले की, “मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी याकूब मेमनची कबर वाचवणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा नोंदवला गेला. कबर वाचवणं हा पोलिसांच्या लेखी गंभीर गुन्हा होता. परंतु देशप्रेमी निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मांना झालेली मारहाण हा साधा गुन्हा म्हणून नोंदवण्यात आला. हल्लेखोरांना जामीनावर सोडलं गेलं. वा रे वा!” असं म्हणत शेलारांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

पुढे बोलताना शेलार म्हणाले, “महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारनं विवेकबुद्धी गहाण ठेवली आहे काय ? हे सराकर आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?” असा बोचरा सवाल शेलारांनी केला आहे.