सावधान ! ITR भरताना ‘हे’ लक्षात ठेवा अन्यथा रिफंड मिळणार नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयकर परताव्याची शेवटची तारीख हि 31 ऑगस्ट 2019 आहे. त्यामुळे सध्या देशभरात याची गडबड सुरु आहे. मात्र अनेकदा आपण आयकर परतावा भरताना अनेक चुका करतो. त्यामुळे आपल्याला मिळणार रिफंड लवकर मिळत नाही. काही नागरिकांची याबाबतीत नेहमीच गडबड होते. अनेकांचे बँक खाते चुकीचे नोंदविले जाते. यामुळे त्यांच्या खात्यात येणारा रिफंड लवकर मिळत नाही. यासाठी घाबरून जाण्याची आवश्यकता नसून आयकर विभागाच्या हेल्पलाईन नंबरवर फोन करून तुम्ही मदत घेऊ शकता.

चुकीचे बँक खाते नोंदविले गेल्यास करा हे काम

1) सर्वात आधी काय करावे
जर तुमच्याकडून हि चूक झाली तर तुम्हाला मिळणारी रिफंडची रक्कम हि थेट तुमच्या खात्यात येणार नसल्यामुळे तुम्ही आयकर खात्याला विनंती करून या रकमेचा चेक देखील मागू शकता.

2) जर तुम्ही आयकर परतावा भरताना तुमच्याकडून काही चूक झाली असेल आणि तुमच्या ज्या खात्यावर हि रक्कम येणार आहे तेच चुकले असेल तर ऑनलाईन अर्जाच्या खात्यावर लॉगइन करून तुम्ही याची पुन्हा एकदा तपासणी करू शकता.

3) जर तुम्ही अजूनपर्यंत परतावा भरला नसेल तर अतिशय सावधगिरीने हि सगळी प्रोसेस करून परतावा भरू शकता.

4) त्यानंतर जर तुम्हाला आयकर रिफंड आला नाही तर तुम्ही एकदा आयकर विभागाला चेक साठी विनंती करू शकता. मात्र जोपर्यंत हि रिफंड प्रक्रिया फेल झाल्याचे आयकर विभागाच्या लक्षात येत नाही तोपर्यंत हा चेक तुम्हाला दिला जात नाही.

आरोग्यविषयक वृत्त –