‘मेड इन चायना’ पणत्या यंदा बाजारातून ‘गायब’, ‘मेक इन इंडिया’चा ‘जादू’ चालू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिवाळी जवळ आली असून भारतात सध्या दिवाळीची मोठी धूम सुरु आहे. यामध्ये ‘मेक इन इंडिया’ची मोठी धूम असून चीनच्या वस्तुंना बाजारात काहीही स्थान नाही. मागील दिवाळीमध्ये बाजारात चीनच्या वस्तुंना मोठी मागणी होती. मात्र यावेळी देशात बनवल्या गेलेल्या पणत्यांना यावेळी मोठी मागणी असून चिनी पणत्यांना काहीही मागणी नाही.

पणत्यांच्या बाजारातून चीन गायब
राजधानी दिल्लीतील सदर बाजारामध्ये मागील तीन दशकांपासून व्यापार करणाऱ्या सुरेंद्र बजाज यांनी सांगितले कि, यावेळी चीनच्या पणत्या बाजारातून गायब असून खूप कमी व्यापारी या पणत्या आयात करत आहेत. दिल्लीतील व्यापारी संघाचे अध्यक्ष देवराज बावेजा यांनी याविषयी सांगितले कि, आयात कमी होत असल्यामुळे बाजारात असणाऱ्या पणत्यांची किंमत वाढली आहे. त्याचबरोबर भारतीय कारागीरांनी चिनी कारागीरांची शैली आत्मसात केली असून ते देखील सुबक पणत्या बनवत आहेत. त्यामुळे बाजारात सध्या केवळ १० टक्के पणत्या विक्री होताना दिसून येत आहेत, ज्या एकेकाळी 70-80 टक्के असतं.

देशातील मुर्त्यांची विक्री
कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले कि, चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या या निर्णयामुळे भारतीय बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात देशी पणत्यांची विक्री वाढली आहे. यामध्ये व्यापाऱ्यांचे योगदान आहेच मात्र ग्राहकांनी देखील याला चांगला प्रतिसाद दाखवला असून देशी मालाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

चीनच्या पणत्या महाग
परमजीत सिंह यांनी सांगितल्यानुसार, चीनमधील पणत्यांचे दर यावेळी मोठ्या प्रमाणात वाढले असून भारतात तयार करण्यात आलेल्या पणत्या या त्यांना टक्कर देत आहे. त्यामुळे ग्राहक देखील भारतीय पणत्या खरेदी करण्याकडे वळत आहेत.

पणत्यांची मागणी
देवांच्या पणत्यांचे दर हे मागील वर्षीप्रमाणेच असून यामध्ये विशेष काही वाढ झालेली नाही. 100 रुपयापासून ते 7,000-8,000 रुपयांपर्यंतच्या पणत्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

भारतीय मुर्त्या अधिक टिकाऊ
अनेक वर्षांपासून पणत्यांचा व्यापार करणाऱ्या मोहम्मद सुलेमान यांनी सांगितले कि, भारतीय पणत्या ह्या रेजिनपासून बनवल्या असल्याने त्या साफ करायला देखील सोप्या असतात. त्यामुळे त्या टिकाऊ देखील असतात.

Visit : Policenama.com