IIM मध्ये शेतकऱ्याच्या मुलानं बनविला ‘अनोखा’ ट्रॅक्टर, डोंगराळ शेतीसाठी अत्यंत ‘फायदेशीर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून राहत डोंगराळ भागातील शेती करणे सोपे नाही. नांगरण्याच्या अडचणीसह सिंचनाची चिंतादेखील वेगळी असते. यासाठी महाराष्ट्रातील श्रीलेश माडेय यांनी शेतकऱ्यांचा अडचणी काही प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. डोंगराळ शेतीच्या नांगरणीसाठी विशेष ट्रॅक्टर तयार केले आहे. ट्रैक्ड्रील असे नाव याला देण्यात आले आहे. आयआयएमच्या फाउंडेशन फॉर इनोवेशन अँड एंटरप्रेन्योरशिप डेवलपमेंटमध्ये तीन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर त्यांना हे यश मिळाले आहे.

शेतकऱ्यांना दोन लाखात मिळू शकणार ट्रॅक्टर :
श्रीलेश यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन आयआयएमने कृषी मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाला निधी देण्याची शिफारस केली आहे. असे झाल्यास पाच ते सहा लाखांत उपलब्ध असलेल्या ट्रॅक्टरच्या पर्यायांत केवळ दोन लाख रुपयांतच शेतकरी याचा वापर करू शकतील. ट्रॅकड्रिल हे डोंगराळ शेतीसाठी डिझाइन केलेले आहे. यासह, तो सहजपणे वर चढण्यास सक्षम आहे. याची खास गोष्ट म्हणजे कमी जागेत तो सहजपणे वळविता येतो. यातून शेतकरी नांगरणी व फॉगिंग सहजपणे करू शकतील.

वडिलांच्या अडचणीने दाखविला मार्ग :
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील ओझर गावचा रहिवासी श्रीलेश माडेय यांचे वडील शेतकरी आहेत. शेती सुलभ करण्यासाठी ट्रॅक्टर खरेदी करायचे होते, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. ऊस लागवडीसाठी पॉवर ट्रिलर खरेदी केले. जे ऑपरेट करणे सोपे नव्हते. येथूनच ट्रैक्ड्रील ची कल्पना सुरू झाली. यासाठी श्रीलेशने हायस्कूलपासून या कामाला सुरुवात केली. वर्ष 2013 मध्ये मेकॅनिकल डिप्लोमा दरम्यान पहिले मॉडेल सादर केले. दरम्यान, त्याने शिवनगर अभियांत्रिकी महाविद्यालयातून यांत्रिकी अभियांत्रिकीचा अभ्यास सुरू केला. येथे ट्रैक्ड्रीलच्या मॉडेलला नवीन रूप मिळाले.

आयआयएम स्टार्टअपला देत आहे चालना :
आयआयएमच्या पहिल्या तीन स्टार्टअपमध्ये श्रीलेशच्या स्वप्नांना पंख देण्याचे काम विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने केले. आयटीआयएम काशीपूर फाऊंडेशन फॉर इनोव्हेशनअँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अंतर्गत तीन महिन्यांचे प्रशिक्षणही स्टार्टअप अंतर्गत देण्यात आले. मंत्रालयाने मॉडेलच्या सादरीकरणासाठी 10 लाख रुपयांचे बजेट दिले. यानंतर 25 लाखांच्या अतिरिक्त मंजुरीसाठी हा प्रकल्प कृषी मंत्रालयालाही पाठविण्यात आला. तेथे पेटंट घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

खर्चात होणार कपात :
श्रीलेश म्हणाले की, ट्रैक्ड्रीलने लागवडीचा खर्च खूपच कमी असेल. हे नांगरणी, पेरणी, स्प्रेअर, रोटावेटर तसेच तण काढून टाकण्यापर्यंत कार्य करेल. त्याचवेळी आयआयएमचे संचालक फडे सुख बत्रा म्हणाले की, आयआयएम काशीपूर फाऊंडेशन फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अंतर्गत श्रीलेशची सर्वोत्कृष्ट स्टार्टअप म्हणून निवड झाली. त्याला तीन महिन्यांचे प्रशिक्षणही देण्यात आले होते. याचा वापर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल.