कारचा अपघात ; एकाचा मृत्यू , दोघे गंभीर 

मडगाव (पणजी)  : वृत्तसंस्था – नाताळ आणि नवीनवर्षाच्या सेलिब्रेशनची सर्वत्रच जोरदार तयार सुरु आहे. गोव्यात तर मोठ्या उत्साहात नाताळ आणि नववर्षानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून सेलिब्रेशन केले जाते.असाच एक बँण्ड शोचा कार्यक्रम आटपून घरी परतत असतांना एका कारने झाडाला धडक दिल्याने कार चालकाचा मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
दक्षिण गोव्यातील मडगाव येथील घोगळ परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हि घटना घडली. ब्रायज फर्नाडीस या चालकाचा मृत्यू झालाअसून अस्नफ्रे जोश्वा वाझ, क्लिटंन मार्टीन्स, न्युसेन पेरेरा हे तिघेगंभीर जखमी आहेत.जखमींवर बांबोळी येथील गोवा वैदयकीय महाविदयालयाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी तरुणांपैकी दोघे म्युझिशियन होते.रात्री आर्पोरा येथील शो आटपून हे चौघेही कारमधून जोश्वाला सोडण्यासाठी पुर्वबगल मार्गे जात होते.अचानक चालकाचा तोल सुटल्याने गाडी झाडावर आदळली आणि हा अपघात घडला.
रात्री आर्पोरा येथील बँण्ड शो आटपून चौघे मडगावला आले होते.जोश्वा हा रावणफोंड येथे रहात असल्याने त्याला घरी पोहचविण्यासाठी पुर्वबगल मार्ग रस्त्यातून जात असताना.अचानक चालकाचा तोल सुटल्याने कार झाडाला आदळली आणि हा अपघात घडला. उपनिरीक्षक फ्रान्सिस ङोवियर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. जखमींना त्वरित मडगावच्या हॉस्पिसियो रुग्णालयात दाखल केले.ब्रायज फर्नाडीस याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.तर जोश्वा व क्लिंटनची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी गोवा वैदयकीय महाविदयालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले.अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा नोंदविला जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.