माढा मतदारसंघ : भाजपकडून मिळणार या मंत्र्याला उमेदवारी ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शरद पवार यांनी काल गुरुवारी माढा मतदारसंघात आपली उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर शरद पवार यांना तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी भाजपमध्ये वाटाघाटींना वेग आला. विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारीसाठी भाजपने गरळ घातली परंतु ते हि शरद पवार यांच्या विरोधात उभा राहण्यासाठी तयार झाले नाहीत. म्हणून भाजपने सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना उमेदवारी देण्याचा अंतिम निर्णय घेतला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

शरद पवार हे माढ्यातून उभे राहिल्यास आम्ही त्यांचा पराभव करू असे विधान चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्या उमेदवारीवर चर्चा सुरु झाल्यावरच केले होते. त्यानंतर शरद पवार यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी द्यायची या बद्दल भाजपात बरीच खलबते कुटण्यात आली. त्यानंतर आज राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे नाव शरद पवार यांच्या विरोधात लढण्यासाठी अंतिम करण्यात आले आहे.

म्हणून भाजप देणार सुभाष देशमुखांना उमेदवारी
सुभाष देशमुख हे भाजपचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांच्या दोन पिढ्या संघाचे कार्य करण्यात गेल्या आहेत. तसेच सुभाष देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे मोठे नेते म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहेत. लोकमंगल समूहातून त्यांनी अनेक लोकांना केलेली मदत तसेच सामुदायिक विवाह सोहळ्यातून मिळवलेले लोकांचे प्रेम हे अलीकडच्या त्यांच्या राजकीय लोकप्रियतेचा भाग म्हणून समोर आले आहे. शरद पवार यांच्या विरोधात उभा राहण्याचा त्यांना २००९ साली अनुभव आल्याने त्यांनाच उमेदवारी दिल्यास तेव्हा झालेल्या पराभवाची सहानुभूतीही थोड्या बहुत प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे असे भाजप नेतृत्वाला वाटले असावे. त्याच प्रमाणे सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल समूहाचे जाळे सोलापूर जिल्ह्यात चांगले असल्याने त्यांना या मतदारसंघात उमेदवार म्हणून अंतिम करण्यात आले आहे.