शिवसेनेच्या ‘या’ आमदाराला जीवे मारण्याची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना आमदार तानाजी सावंत यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. आमदार तानाजी सावंत यांच्या मूळगावी धमीकीचे पत्र आले आहे. राजकीय वैमनस्यतुन पत्र आलं असावं असं त्याचं म्हणणं आहे.

यापूर्वीच त्यांनी पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे संरक्षण मागितले होते. पुन्हा एकदा धमकीचं पत्र आल्यानंतर आज ते स्वतः पोलीस आयुक्तालयात आले होते. त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटून ते पोलीस संरक्षणाची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वडगाव तांदली (अहमदनगर) येथील बाळासाहेब सातपुते नावाची व्यक्ती गुन्हेगारी स्वरूपाची असून आपणास ठार मारण्यासाठी पूर्ववैमनस्यातून काही लोकांनी या व्यक्तीची मदत घेतली आहे. अज्ञाताने पत्र पाठवले आहे. माझं कोणाशीही वैर नाही माझ्यावर २ जिल्ह्याची जबाबदारी आहे. मी पत्र आल्यानंतर भेटायला आलो असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, हे पत्र आमदार तानाजी जाधव यांचे भाऊ शिवाजी सावंत यांच्या घरी आले आहे. त्यामुळे शिवाजी सावंत यांनी याबाबत माढा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.