Madha Police | माढा पोलीस स्टेशनच्या सबजेलमधून 4 आरोपींचे पलायन

माढा न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  माढा येथील तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या सबजेलमधून (Madha Police Subjail) सोमवारी (दि.19) सकाळी आठच्या सुमारास चार गंभीर गुन्ह्यातील आरोपींनी पलायन (four accused escaped) केले. आरोपींना पकडण्यासाठी माढा पोलीस ठाण्यातील (Madha Police Station) पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून नाकाबंदी केली आहे. तसेच जवळच्या पोलीस स्टेशनला या संदर्भात कळवण्यात आले आहे.

माढा सबजेलमधून (Madha Subjail) टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये (Tembhurni police station) दाखल असलेल्या गुन्ह्यातील दोन आरोपी व कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात (Kurduwadi police station) दाखल असलेल्या गुन्ह्यातील दोन आरोपी असे एकूण चार आरोपींनी पळ काढला आहे.

सिद्धेश्वर शिवाजी केचे (बनावट चलनी नोटा, टेंभुर्णी पोलीस स्टेशन), आकाश उर्फ अक्षय रॉकी भालेकर (302 टेंभुर्णी पोलीस स्टेशन), अकबर सिद्दाप्पा पवार (बेकायदेशीर हत्यार बाळगणे, कुर्डूवाडी पोलीस स्टेशन), तानाजी नागनाथ लोकरे (पास्को, कुर्डूवाडी पोलीस स्टेशन) असे पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, हे चार आरोपी माढा सबजेलमधून सोमवारी सकाळी अकबर पवार यास झटका आल्याचा बनाव केला.
यावेळी दरवाजा उघडल्यावर आरोपींनी झटापट करुन सबजेलमधून पळ काढला. या ठिकाणी ड्युटीवर असेलले पोलीस हेडकॉन्स्टेबल पवार यांना धक्कामारुन पळून गेले.
या घटनेची माहिती मिळताच माढा पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे.
या प्रकरणाची माढा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
तसेच परिसरातील वैराग, कुर्डूवाडी, टेंभुर्णी तालुका पोलीस स्टेशनमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Web Title : Madha Police | four accused escaped madha police station sub jail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai Police | कडक सॅल्यूट ! भर पावसात जखमी बापलेकीला मुंबई पोलिसानं सुरक्षित स्थळी हलवलं

PM Modi | सर्व पक्षांच्या प्रमुखांना PM नरेंद्र मोदी देणार कोरोनासंबंधीची सविस्तर माहिती; पंतप्रधानांची ग्वाही

Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’ वर पाणीच पाणी; पेणमध्ये गणेशमूर्ती पाण्यात?