रतन टाटा बायोपिकमध्ये काम करणार R माधवन ? सोशल मीडियावर व्हायरल होतेय पोस्टर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सोशल मीडियाच्या दुनियेत कोणते ट्विट कधी व्हायरल होईल आणि कधी कोणती अफवा खरी मानली जाईल हे सांगणे फार कठीण आहे. आता अभिनेता आर माधवनच्या बाबतीतही असेच घडले आहे. सोशल मीडियावर गेल्या काही काळापासून असा कयास लावला जात आहे की, आर. माधवन, बिझनेसमन रतन टाटाच्या बायोपिकमध्ये काम करणार आहे. तो रतन टाटाच्या भूमिकेत दिसणार आहे. सोशल मीडियावर त्याचे एक पोस्टरही जोरदार व्हायरल होत होते. त्या पोस्टरमध्ये माधवनचा फोटो रतन टाटाच्या नावाखाली ठेवण्यात आला आहे. हेच पोस्टर पाहून एका चाहत्यानेही प्रश्नही विचारला आहे.

प्रश्न असा आहे की- तुम्ही रतन टाटाच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहात. जर असे झाले तर ते बर्‍याच लोकांसाठी प्रेरणास्थान बनतील. या चाहत्याच्या प्रश्नाला खुद्द माधवनने उत्तर दिले आहे. चाहत्यांच्या अपेक्षा भंग करत माधवनने स्पष्ट केले की, अशा कोणत्याही चित्रपटात तो काम करणार नाही. त्याला सध्या रतन टाटाची भूमिका साकारण्याची ऑफर मिळालेली नाही.

ट्विटमध्ये असे लिहिले आहे – दुर्दैवाने हे खरे नाही. ही फक्त काही चाहत्यांची इच्छा आहे, म्हणून त्यांनी अशी पोस्टर केली आहेत. असा कोणताही प्रकल्प पाइपलाइनमध्ये नाही. यावर कोणतीही चर्चा चालू नाही. माधवन जरी रतन टाटाच्या बायोपिकमध्ये दिसत नसला तरी त्यांचा आगामी चित्रपट Rocketry: The Nambi Effect जोरदार रंगत आहे. हा चित्रपट एरोस्पेस अभियंता नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित आहे.