Madhavi Gogate | ऑनस्क्रीन आईच्या निधनानंतर अनुपमा फेम Rupali Ganguly ला मोठा धक्का, म्हणाली – ‘खुप काही शिल्लक राहिलं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Madhavi Gogate | ‘स्टार प्लस’ (Star Plus) चॅनेलवर लोकांना वेड लावणारी मालिका म्हणजे ‘अनुपमा’ (Anupama). या मालिकेने मोठ्या प्रमाणात लोकांचं मन जिंकलं आहे. या मालिकेमध्ये अनुपमा म्हणजेच रुपाली गांगुली (Rupali Ganguli) मुख्य भूमिका साकारत असून तिच्या आईची भूमिका पार पाडणाऱ्या अभिनेत्री माधवी गोगटेचं (Madhavi Gogate) निधन (Death) झालं असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

 

 

 

माधवी गोगटे (Madhavi Gogate) यांना काही दिवसांपुर्वी कोरोनाची (Corona) लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना उपचारासाठी मुंबईच्या रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. तसेच त्यांच्यावर होणाऱ्या उपचारांनी त्यांची स्थिती सुधरत होती. मात्र अचानक 21 नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

 

 

 

58 वर्षाच्या असलेल्या माधवी गोगटे यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
एवढंच नाही तर त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.
यावेळी त्यांनी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अशोक सराफसोबत (Ashok Saraf) देखील काम केलं आहे.
तसेच बाॅलिवूडमधील ‘जैसे कोई अपना सा’, (Jaisa Koi Apna Sa) ‘ऐसा कभी सोचा ना था’,
(Aisa Kbhi Socha Na Tha) ‘कहीं तो होगा’ (Kahin Toh Hoga), या चित्रपटांमध्ये माधवी यांनी काम केलं आहे.

 

माधवी गोगटे (Madhavi Gogate) यांच्या मृत्यूने अनुपमा मालिकेच्या संपुर्ण कास्टला धक्का बसला आहे.
मात्र सर्वात जास्त धक्का अनुपमा अर्थात अभिनेत्री रुपाली गांगुली हिला बसला आहे.
रुपालीने इंस्टा स्टोरीवर माधवी यांच्यासाठी पोस्ट शेअर केली आहे. यावेळी तिने खुप काही बोलायचं राहिलं आहे, असं तिने कॅप्शन दिलं आहे.

 

Web Title :- Madhavi Gogate | anupamaa fame tv actress madhavi gogate dies co star rupali ganguly shares post marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा