Madhavi Gogate | ‘भ्रमाचा भोपळा’ आणि ‘गेला माधव कुणीकडे’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं 58 व्या वर्षी मुंबईत निधन

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Madhavi Gogate | मराठी कलाविश्वातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे (Madhavi Gogate) यांचं निधन (Passes Away) झालं आहे. त्या 58 वर्षांच्या होत्या. त्यांनी आज मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात (Seven Hill Hospital) अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

 

माधवी गोगटे (Madhavi Gogate) यांनी मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये आपली छाप पाडली आहे. त्यांनी नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. माधवी गोगटे (Madhavi Gogate) यांची ‘भ्रमाचा भोपळा’, ‘गेला माधव कुणीकडे’ ही नाटके प्रचंड गाजली होती. या नाटकांप्रमाणेच ‘घनचक्कर’ या मराठी चित्रपटातील त्यांची भूमिका लोकांना विशेष आवडली होती. विशेष म्हणजे त्यांनी अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केलं होते.

माधवी गोगटे (Madhavi Gogate) यांनी ‘मिसेस तेंडुलकर’, ‘कोई अपना सा’, ‘ऐसा कभी सोचा न था’,
‘एक सफर’, ‘बसेरा’, ‘बाबा ऐसो वर ढुंडो’, ‘ढुंड लेंगी मंजिल हमें’, ‘कहीं तो होगा’ या हिंदी मालिकेत काम केले आहे.
याबरोबर त्यांनी “तुझं माझं जमतंय” या मराठी मालिकेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
माधवी गोगटे यांच्या माघारी त्यांचे पती आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे.

 

Web Title :- Madhavi Gogate | veteran marathi actress madhavi gogate passes away at the age of 58 in mumbai’s seven hill hospital

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

IND Vs NZ Test Series | न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूनं दिला इशारा; म्हणाला – ‘अश्विन-अक्षरसाठी प्लॅन रेडी

Pankaja Munde | पंकजा मुंडेंनी पुन्हा व्यक्त केली खदखद, म्हणाल्या – ‘फाटक्या माणसासमोर नतमस्तक होईल, पण…’

Crime News| धक्कादायक ! दोघांमध्ये ‘फाटल्या’नंतर रागाच्या भरात गर्लफ्रेन्डनं केला बॉयफ्रेन्डवर अ‍ॅसिड हल्ला, डोळा कामातूनच गेला

SL Vs WI Galle Test Match | वेस्ट इंडिजच्या खेळाडू Jeremy Solozano ला गंभीर दुखापत

Tadoba National Park | वाघाच्या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा दुर्देवी मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Vinod Tawde | माजी मंत्री विनोद तावडे यांचे अखेर पुनर्वसन ! भाजपने दिली मोठी जबाबदारी; देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन

Sean Whitehead | दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ ऑल राऊंडरने अनिल कुंबळेला मागे टाकत एका इनिंगमध्ये घेतल्या 10 विकेट्स