Birthday Special : अंगावर शहारे आणते ‘दिलीप कुमार-मधुबाला’ची अधुरी ‘प्रेमकहाणी’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आज आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जिचा जन्म प्रेमाच्या दिवशी म्हणजेच वॅलेंटाईन डेच्या(14 फेब्रुवारी) दिवशी झाला. परंतु आयुष्यभर तिला प्रेमासाठी तरसावं लागलं आणी तिची प्रेमकहाणी अधुरी राहिली. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मुधबाला आहे. मुधबालाचा जन्म 14 फेब्रुवारी 1933 मध्ये झाला होता. मधुबालाचं खरं नाव बेगम मुमताज जहां देहलवी होतं. आज आपण मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या प्रेमकहाणीबद्दल जाणून घेणार आहोत.

एकमेकांना पाहता क्षणीच एकमेकांच्या प्रेमता पडले

1957 साली तराना सिनेमादरम्यान दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. जेव्हा त्यांनी एकमेकांना पाहिलं तेव्हाच ते एकमेकांच्या प्रेमता पडले होते. दिलीप कुमार प्रेम व्यक्त करण्यासाठी धजावत नाही हे पाहून मधुबालानं पुढाकार घेत दिलीप कुमार यांना प्रपोज केलं. मधुबालानं खास अंदाजात दिलीप कुमार यांना एख पत्र आणि फूल पाठवले होते. या पत्रात लिहिलं होतं की, जर माझ्यावर प्रेम करत असाल तर गुलाबाच फूल स्विकार करा. दिलीप कुमारांनीही फूल स्विकारलं.

…आणि हा साखरपुडा मोडला

दोघेही प्रेमात आकंठ बुडाले होते. जिथे कुठे मधुबालाची शुटींग असायची दिलीप कुमार तिथे पोहोचायचे. दिलीप कुमार आणि मधुबाला यांनी तराना, संगदिल, अमर, मुघल ए आज़म यांसारख्या अनेक सिनेमात काम केलं आहे. असं म्हटलं जात आहे की, दिलीप कुमार आणि मधुबाला यांचं नातं साखरपुड्यापर्यंत पोचलं होतं. पंरतु मधुबालाचे वडिल अताउल्ला खान यांच्यामुळे हा साखरपुडा मोडला आणि ही प्रेमकहाणी अधुरीच राहिली.

https://www.instagram.com/p/B8id_OmhK2Q/

मधुबालाचे वडिल अताउल्ला खान मधुबालाच्या सेटवर जात असत. ते नेहमीच मधुबालावर नजर ठेवू लागले. ते तिच्या सेटवर जाऊ लागले होते. प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करू लागले. यानंतर दिलीपी कुमार उताउल्ला यांना नापसंत करू लागले.

दिलीप कुमार आणि मधुबाला यांना लग्न करायचं होतं परंतु लग्नाआधीच त्यांनी मधुबालासमोर वडिलांना तसेच सिनेमे सोडण्याची अट घातली. मधुबालाला हे अजिबात आवडलं नाही. कारण मधुबालाचं वडिल अताउल्ला यांच्यावर प्रेम होतं. यावरून दोघांचा वाद सुरू झाला.

1956 मध्ये गोष्ट अजूनच बिघडली. यावेळी नया दोर सिनेमाठी बी आर चोपडानं भोपाळला शुटींग करण्याचा निर्णय घेतला. मधुबालाच्या वडिलांचा मुंबईच्या बाहेर शुटींग करणं मंजूर नव्हतं. यानंतर सिनेमात तिच्याजागी वैजयंतीमाला हिला साईन करण्यात आलं. असं म्हटलं जात आहे की, बी आर चोपडाच्या या निर्णयाला दिलीप कुमार यांनीही सपोर्ट केला होता.

…आणि ही प्रेमकहाणी अधुरीच राहिली.

चोपडांनी वृत्तपत्रात याबाबत जाहिरात दिली ज्यात मधुबालाच्या फोटोवर फुली मारण्यात आली होती आणि तिच्या जागी वैजयंतीमालाचा फोटोही होता. यानंतर अताउल्ला खान यांनी प्रत्युत्तर देत एक जाहिरात दिली. ज्यात मधुबालाच्या सिनेमांची नावं होती आणि नया दोर या नावावर फुली होती. खान यांनी या सिनेमाच्या शुटींगवर बंदीची मागणी केली होती. कोर्टात याचा खटला सुरू झाला. यावेळी दिलीप कुमार यांना कोर्टात बोलावण्यात आलं आणि विचारलं की त्यांचं मधुबालावर प्रेम आहे का. दिलीप कुमार यांनी सर्वांसमोर सांगितलं होतं की, होय माझं मधुवर प्रेम आहे आणि कायम करत राहिल. परंतु तेव्हा खूप उशीर झाला होता. मधुबालाला दिलीप कुमारांचं वागणं अजिबात आवडलं नव्हतं. दिलीप कुमारही त्यांची समजूत घालू शकले नाही आणि ही प्रेमकहाणी अधुरीच राहिली.

दिलीप कुमारांना मधुला शेवटचंही पाहता आलं नाही.

23 फेब्रुवारी 1969 रोजी मधुबालानं जगाचा निरोप घेतला. यावेळी दिलीप कुमार मद्रासमध्ये सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त होते. त्यांना जेव्हा ही बातमी मिळाली तेव्हा खूप उशीर झाला होता. ते जेव्हा घरी पोहोचले तेव्हा मधुबालावर अंतिम संस्कार झाले होते. त्यांना मधुला शेवटचंही पाहता आलं नाही.

https://www.instagram.com/p/B8hKWT-J5rl/