मधुकर पिचडांनी शरद पवारांना ‘चूना’ लावला, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाखांची ‘खोचक’ टीका

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – मधुकर पिचड पवारांना चूना लावून गेले. अशी खोचक टीका ज्येष्ठ नेते यशवंत गडाख यांनी मधुकर पिचड यांच्यावर केली. मधुकर पिचड यांना शरद पवार यांनी खूप काही दिले. अजित पवार यांनीही पिचड यांचे लाड केले. वीस वर्षे पिचडांना आमच्या डोक्यावर नाचविले, पण अखेर पिचड पवारांना चुना लावून पक्ष सोडून गेले अशी खरमरीत टीका यशवंतराव गडाख यांनी केली.

शंकर गडाख शेतकरी क्रांतिकारी पक्षाकडून निवडणूक लढणार –

सोनाई येथे क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. हा मेळावा त्यांनी त्यांच्या मुलाच्या म्हणजेच आमदार शंकर गडाख यांच्या निवडणूकीच्या तयारी निमित्त घेतला.

शंकर गडाख यांनी विधानसभा निवडणूकीची तयारी सुरु केली असून ते कोणत्याही पक्षाकडून निवडणूक न लढता शेतकरी क्रांतिकारी पक्षाकडूनच निवडणूक लढणार आहेत. निवडणूकीनंतर ज्या पक्षाची सत्ता येईल त्यांच्या सोबत जाण्याचा विचार करु असे देखील त्यांनी मेळाव्यात स्पष्ट केेले.

आपण चाळीस-पन्नास वर्षे राजकीय संघर्षात घालवली. संस्था वाढवल्या त्या जपल्या मात्र आता तरी कार्यकर्त्यांनी वरून कीर्तन आतून तमाशा करू नये. माझे भाषण हे शेवटचे आहे का मला माहिती नाही. मला तुम्हाला काही मागायचे नाही, पण आयुष्याचा शेवट गोड व्हावा अशी इच्छा आहे, असे भावनिक आवाहन देखील त्यांनी उपस्थितांना केले.

बाळासाहेब मुरकुटेंवर निशाणा –

गडाख यांनी आजारपणातून सावरल्यानंतर ही पहिलीच सभा घेतली. यावेळी त्यांनी आक्रमक होऊन मधुकर पिचड यांच्यावर निशाणा साधला. नेवाशाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, मुरकुटे हे दक्षिणच्या खासदारांच्या पायातले घुंगरू असून त्यांना पाच वर्षांत साधी एक शाळाही काढता आली नाही. आताची राजकीय परिस्थिती पाहिली, तर असं वाटते की दोन वर्षांपूर्वी आपण बाहेर पडलो. कोणत्या भानगडीत पडलो नाही, हे बरच झाले.

पिचड अजित पवारांचे लाडके, पण चूना लावून गेले –

या बैठकीत मधुकर पिचड यांचा खरमरीत समाचार घेताना ते म्हणाले जे पक्षातून दुसरीकडे गेले, त्यांना लोकांनी पाडले पाहिजे. मधुकर पिचडांना शरद पवारांनी काय नाही दिलं. अजित पवारांचे तर ते खूप लाडके, पण शेवटी ते पवारांना चुना लावून गेले. आता राष्ट्रवादी व काँग्रेसची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे कुणाचे काही नको, स्वतःच्या ताकदीवर आणि शक्तिवर लढायचे. ज्याचे सरकार येईल त्यात सहभागी व्हायचे आणि विकासासाठी ज्यांची सत्ता येईल त्यांच्यासोबत जायचे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like