Madhura Deshpande | तब्बल 3 वर्षांनी अभिनेत्री मधुरा देशपांडे दिसणार ‘या’ मालिकेत; साकारणार ‘हि’ महत्त्वाची भूमिका

पोलीसनामा ऑनलाइन : छोट्या पडद्यावर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता लवकरच अभिनेत्री मधुरा देशपांडे (Madhura Deshpande) देखील पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. ‘शुभविवाह’ या मालिकेतून ती छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या मालिकेत ती (Madhura Deshpande) महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असून तब्बल 3 वर्षानंतर ती मालिका विश्वात परतत आहे.

शुभविवाह या मालिकेमध्ये मधुरा भूमी हे पात्र साकारणार आहे. बहिणीच्या स्वप्नांसाठी स्वतःची त्याग देणारी अशी ही भूमी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर भूमी या व्यक्तिरेखे बद्दल बोलताना मधुरा म्हणाली, “माझ्यासाठी हे पात्र खूप महत्त्वाचे असणार आहे आणि अशा पद्धतीचे पात्र मी पहिल्यांदाच साकारणार आहे .जी आपल्या कुटुंबासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावते. त्यात मी तीन वर्षांनी पुन्हा मालिकेत काम करणार असल्यामुळे मी खूपच उत्साही आहे आणि भूमी हे पात्र साकारणे माझ्यासाठी नवं आव्हान देखील असणार आहे”.

पुढे बोलताना मधुरा (Madhura Deshpande) म्हणाली, ” मी साकारणाऱ्या पात्राचे नवनवीन पैलू दररोज
उलघडत आहे. यासाठी आमची टीम खूप पराकाष्टाने प्रयत्न करत आहे. तर लवकरच शुभविवाह या
मालिकेनिमित्त एक कुटुंब प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आशा करते ही मालिका आणि माझे पात्र देखील
तुम्हाला आवडेल”. आता मधुराचे चाहते तिच्या या नवीन मालिकेसाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.

Web Title :– Madhura Deshpande | madhura deshpande comeback on tv after three years with shubhvivah marathi tv serial

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Traffic Police | उद्या (दि. 31 डिसेंबर) पुणे कॅम्प (लष्कर) परिसरातील वाहतूकीत बदल; फर्ग्युसन रोड आणि एमजी रस्ता 10 तासांसाठी नो-व्हेईकल झोन

Madhurani Gokhale Prabhulkar | मॉडर्न कपड्यांवरून ट्रोल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युजरला अरुंधतीने दिले ‘हे’ सडेतोड उत्तर

Gautami Patil | सोलापुरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी; प्रेक्षकांनी देखील धरला ठेका