Madhurani Gokhale Prabhulkar | मॉडर्न कपड्यांवरून ट्रोल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युजरला अरुंधतीने दिले ‘हे’ सडेतोड उत्तर

पोलीसनामा ऑनलाइन : ‘आई कुठे काय करते’ सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. याच मालिकातील अरुंधती ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Gokhale Prabhulkar) देखील चाहत्यांची तितकीच आवडती आहे. मधुराणी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज चाहत्यांसाठी ती शेअर करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. नुकताच तिने तिच्या इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर केला आहे. ज्यावरून एका युजरने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र मधुराणीने (Madhurani Gokhale Prabhulkar) त्याला उत्तर देत त्याचे तोंड बंद केले आहे.

सध्या सर्वत्र व्हेकेशन मोड दिसत आहे आणि कलाकार आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहेत. मधुराणी प्रभुलकर देखील तिच्या मुलीसोबत व्हेकेशन एन्जॉय करताना एक फोटो तिने शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने म्हटले ‘आई आणि मुलीचा व्हेकेशन टाईम’ याच फोटोला एका युजरने कमेंट करत मधुराणीच्या मॉर्डन कपड्यांवर भाष्य केले आहे. या युजरने कमेंट करत म्हटले की, “जेव्हा तुम्ही सभ्य भूमिका साकारता त्यानंतर असे मॉर्डन लुक मध्ये फोटो शेअर करण्याचे कारण काय? विवाहित स्त्रिया काही असो कुंकू लावतात आणि कुंकू लावल्यामुळे त्यांना काही मॉडर्न रोल देणार नाही असे नाही. मालिकेत तुम्ही सभ्य भूमिका साकारता आणि त्यानंतर अशा पद्धतीचे फोटो शेअर करता यातून तुम्ही तुमच्या मुलांना नक्की काय आदर्श देता? कितपत योग्य आहे हे? दाक्षिणात्य अभिनेत्री त्यांच्या पारंपरिक पद्धतीच्या वेशभूषा वैयक्तिक आयुष्यात प्रकाशाने पाळतात मग तुम्ही का नाही”?

युजरने केलेल्या कमेंट वर उत्तर देत मधुराणी (Madhurani Gokhale Prabhulkar) म्हणाली,
“मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय करते किंवा काय नाही हे मला विचारणारे सांगणारे तुम्ही कोण?
जर तुम्हाला मराठी परंपरेचा इतका पुळका असेल तर तुम्ही का पाश्चात्य लोकांचा ब्लेजर घालून फोटो काढलाय?
मराठी पेरावा करायला हवा होता ना”. मधुराणीच्या या कमेंटला अनेक युजरने कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे.
सध्या माधुरीचा हा फोटो आणि तिचे हे कमेंट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

Web Title :–  Madhurani Gokhale Prabhulkar | aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar answer back to user who try to troll her for modern look

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Traffic Police | उद्या (दि. 31 डिसेंबर) पुणे कॅम्प (लष्कर) परिसरातील वाहतूकीत बदल; फर्ग्युसन रोड आणि एमजी रस्ता 10 तासांसाठी नो-व्हेईकल झोन

Brazil Football Legend Pele Dies At 82 | महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन

Gautami Patil | सोलापुरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी; प्रेक्षकांनी देखील धरला ठेका