‘नामवंत’ लोकच महिलांचे ‘लैंगिक’ शोषण, ‘छेडछाड’ करतात : माधुरी दीक्षित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सिनेसृष्टीत २०१८ साली मीटू चळवळ सुरु झाली होती. त्यात अनेक मोठे खुलासे झाले. ज्या महिला कालाकार लैंगिक शोषणाच्या शिकार झाल्या होत्या त्या सर्वांनी आपले अनुभव सोशल मीडियावर शेअर केले होते. या सर्व महिला कलाकारांना इंडस्ट्रीतील अनेकांनी सपोर्टही केला होता. आता या सर्वांच्या समर्थनार्थ बॉलिवूडची प्रसिद्ध अदाकारा माधुरी दीक्षितने या सर्वावर भाष्य केलं आहे.

प्रत्येक ठिकाणी महिलांना सुरक्षित राहण्याचा अधिकार आहे
नुकतीच माधुरी एका इव्हेंटमध्ये आली होती. यावेळी मीडियाने तिला लैंगिक शोषण आणि छेडछाडीबाबत अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी माधुरीने सर्वात आधी महिलांसाठी सुरक्षित समाजाबाबत भाष्य केलं. माधुरी म्हणाली की, “केवळ फिल्म इंडस्ट्रीच नाही तर प्रत्येक ठिकाणी महिलांना सुरक्षित राहण्याचा अधिकार आहे. बस, ट्रेन, सार्वजनिक ठिकाणांवर अनेकदा त्यांना वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते.”


प्रसिद्ध लोकच महिलांचे शोषण करतात त्यांचं काय ?
पुढे ती म्हणते की, “मोठया लोकांसोबत अशा घटना घडल्या तर त्या प्रकाशात येतात. सोबतच जे आरोपीच मोठे किंवा प्रसिद्ध असतात, त्यांच्याबद्दल सर्वच जाणतात. परंतु जे प्रसिद्ध लोक असतात आणि ते महिलांचे शोषण करतात त्यांचे काय ?” असा सवालही तिने उपस्थित केला. पुढे ती म्हणाली की, “सर्वात आधी समाजातील लोकांना शिक्षित करणं खूपच गरजेचं आहे. जेणे करून ते कोणतीही भीती न बाळगता महिलांचे समर्थन करतील.” असे माधुरी म्हणाली.

माधुरीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, नुकतीच ती करण जोहरच्या कलंक सिनेमात दिसली होती. हा सिनेमा म्हणावा तितका चाललानाही. असे म्हटले जात आहे की, या सिनेमाला आपले बजेट वसूल करणेही अवघड गेले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पाहिल्या पाऊसाचा आनंद घ्या मनसोक्त, बिनधास्त भिजा

वजन कमी करण्याची ‘ही’ थेरपी करून पाहा