बेडसीनसाठी ‘या’ अभिनेत्याला आवरणं व्हायचं अवघड ; रोमँटीक सीनसाठी घाबरायच्या अ‍ॅक्ट्रेस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता विनोद खन्ना भलेही आज या जगात नाही, परंतु आपल्या अभिनयाच्या जोरावर ते नक्कीच अमर झाले आहेत. त्यांच्या काळात अनेक हिरोईन्स त्यांच्यावर मरत होत्या. जेव्हा ते शुटींग करायचे असं वाटायचं की, ते खरंच घडत आहे. यामुळेच त्यांच्यासोबत रोमँटीक सीन करताना अभिनेत्रींना भीती वाटायची.

मीडिया रिपोर्टनुसार, रोमँटीक करताना विनोद खन्ना अनेकदा आपल्यावरील नियंत्रण हरवून बसायचे, त्यांना सांभाळणंही काही वेळेस अवघड होऊन जायचं. अशाही बातम्या समोर आल्या आहे की, दयावान या सिनेमादरम्यान माधुरी दीक्षित सोबत इंटिमेट सीन देताना त्यांनी स्वत:वरील नियंत्रण हरवले होते, ते इतके वाहून गेले की त्यांनी माधुरीचे ओठ अक्षरश: चावून टाकले होते. सिनेमा रिलीज झाल्यानंतर या सीननंतर माधुरीवर खूपच टीका करण्यात आली होती.

माधुरी दीक्षितच्या आधी या घटनेची शिकार डिंपल कपाडियादेखील झाली होती. तो सीन प्रेम धरम या सिनेमाचा होता. त्यावेळी विनोद खन्ना यांचे स्टार यशाच्या शिखरावर होते. शिवाय ते डबल शिफ्टमध्ये काम करायचे. त्यामुळे महेश भट्ट यांनी तो सीन रात्री शुट करण्याचे ठरवले. सेटवरील लाईटही खूप डिम होती. अ‍ॅक्शन म्हणताच विनोद खन्ना डिंपलला किस आणि हग करु लागले.

जेव्हा महेश भट्ट कट म्हणाले तेव्हा विनोद खन्ना यांनी ऐकलंच नाही आणि सीन तसाच सुरु ठेवला. यावेळी डिंपल खूपच घाबरून गेली होती. तिने कशीबशी स्वत:ची सुटका केली. त्यानंतर ती पळत पळत मेकअप रुममध्ये गेली आणि कोठेतरी लपली. ती नाराजही होती. त्यानंतर तिने शुटसाठीही नकार दिला होता. त्यावेळी महेश भट्ट यांनी डिंपलची माफीही मागितली होती.

महेश यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, “विनोद नशेमध्ये होते. यामुळेच ते स्वत:ला आवरू शकले नाहीत. इथे रोचक गोष्ट अशी आहे की, या सीननंतरही डिंपल विनोद यांच्यावर नाही तर महेश भट्ट यांच्यावर नाराज होती. शिवाय हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही. या सिनेमानंतर अनेक सिनेमांमध्ये डिंपलने विनोद खन्ना सोबत काम केले आहे.