धकधक गर्ल माधुरी दीक्षित करणार पॉप सिंगिंग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आपल्या अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी माधुरी आता गाण्याच्या दुनियेत पदार्पण करत आहे. सध्या तशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. नुकतंच तीच कलंक चित्रपटातील तबाह हो गए हे गाणं प्रदर्शित झालं आहे. सध्या ते गाणं चांगलंच व्हायरल होताना दिसत आहे.

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, माधुरी पहिल्यांदाच व्यावसायिक पातळीवर गायन करणार असल्याचं समजत आहे. माधुरीने स्वत: याविषयी माहिती दिली आहे. ती म्हणाली की, “माझ्या पहिल्या अल्बमचं रेकॉर्डिंग झालं आहे. हा अल्बम या वर्षीच प्रदर्शित होणार आहे.” असेही माधुरी म्हणली. दरम्यान या अल्बमचे चित्रीकरण बाकी असून सध्या माधुरी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याने हे चित्रीकरण लांबणीवर टाकले आहे असेही समजत आहे. माधुरी पहिल्यांदाच पॉप सिंगिंग करणार आहे.

माधुरीचा हा इंग्लिश अल्बम असून त्यात सहा पॉप साँगचा समावेश आहे. ती पहिल्यांदाच पॉप सिगिंग करत असल्याने फार उत्सुक असल्याचेही समजत आहे. याआधीही माधुरीने गाणे गायले आहे. गुलाब गँग या चित्रपटासाठी रंग सारी हे गाणे माधुरीने गायले होते. ती कलंक या आगामी चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट 17 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

Loading...
You might also like