Madhuri Dixit | अभिनेत्री माधुरी दीक्षितची आई स्नेहलता दीक्षित यांचे निधन; वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पोलीसनामा ऑनलाइन टीम : बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची अशी वेगळी जागा बनवली आहे. आज मात्र माधुरीसाठी दुःखाचा दिवस आहे. आज माधुरीची (Madhuri Dixit) आई स्नेहलता दीक्षित (Snehlata Dixit Passed Away) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आज सकाळी 8.40 वाजता त्यांचे निधन झाले. स्नेहलता यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. आज दुपारी मुंबईत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

मुंबईतील वरळी येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीमध्ये स्नेहलता यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. स्नेहलता यांच्या निधनाने माधुरी आणि त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. माधुरी या आपल्या आईच्या खूपच जवळ होत्या. माधुरीच्या कठीण प्रसंगात तिच्या आईने तिला खूप साथ दिली होती. माधुरीची आई तिची जवळची एक जिवलग मैत्रीण होती. आईच्या या अशा अचानक जाण्याने माधुरीला मोठा धक्का बसला आहे.

स्नेहलता यांच्या जाण्याने माधुरीच्या आयुष्यात न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे.
स्नेहलता यांच्या निधनाची बातमी माधुरी दीक्षितचे (Madhuri Dixit) नातेवाईक रिक्कू राकेश नाथ यांनी दिली.
त्यानंतर माधुरी दीक्षितने सोशल मीडियावर ही दुःखद घटना शेअर करत चाहत्यांपर्यंत ही गोष्ट पोहचवली आहे.
यावेळी माधुरीने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की,
“माझी प्रिय आई स्नेहलता दीक्षित यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबई येथे अंत्यसंस्कार होणार आहे”.

Web Title : Madhuri Dixit | madhuri dixit mother snehlata dixit passed away funeral will be held in worli mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Beed Crime News | 5 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलाचा विहिरीत आढळला मृतदेह; नेमके काय आहे प्रकरण?

Pune Crime News | बसस्टॉपवर मैत्रिणीचा घेतला कीस; लग्न केले नाही तर जीव देण्याची दिली धमकी

Jalna Crime News | मरणानंतरही साथ सोडली नाही; पत्नीच्या मृत्यूनंतर अवघ्या 5 तासांनी पतीनेदेखील सोडले प्राण

Pune Cyber Crime News | माजी खासदार निलेश राणे यांना अपमानास्पद शिवीगाळ, बदनामी केल्याचा प्रकार; सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Jalna Accident News | लेकीला भेटण्यासाठी घरातून निघालेल्या वृद्ध पती-पत्नींचा अपघातात मृत्यू; मुलीची भेट राहिली अपूर्ण

Pune Police Inspector Transfer | ‘फरासखाना’चे वरिष्ठ पो. निरीक्षक शब्बीर सय्यद यांची बदली तर कोंढव्यात पो. निरीक्षक संदीप भोसले यांची नियुक्ती