पाहा : ‘या’ 5 टॉपच्या अभिनेत्रींचा ‘नो मेकअप लुक’ ! (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 90 दशकातील अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांची जादू आजही प्रेक्षकांवर चालते. प्रेक्षकांच्या मनावर आजही या अभिनेत्री राज्य करतात. याचे कारण म्हणजे त्यांचे सौंदर्य नाही तर त्यांची अदाकारी आहे. पडद्यावर नेहमीच वेगळ्या लुकमध्ये या अभिनेत्री दिसत असतात. आज 90 च्या दशकातील माधुरी दीक्षित, रवीना टंडन, मीनाक्षी शेषाद्री, जुही चावला, तब्बू अशा पाच अभिनेत्रींचा नो मेकअप लुक आज आपण पाहणार आहोत.

1) माधुरी दीक्षित – बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करते. आजही ती इंस्ट्रीत सक्रिय आहे. नुकतीच ती कलंक सिनेमात दिसली होती. हा सिनेमा विशेष काही चालला नाही. सध्या माधुरी एक टीव्ही शो जज करत आहे.

2) तब्बू – 47 वर्षांची तब्बू आजही अविवाहित आहे. आजही तब्बू पडद्यावर खूपच सुंदर दिसते. चाहत्यांना ती नेहमीच भुरळ घालत असते.

3) जुही चावला – अभिनेत्री जुही चावला देखील आजही इंडस्ट्रीत सक्रिय आहे. वयाची 51 वर्षे पार केलेली जुही चाहत्यांमध्ये आजही लोकप्रिय आहे.

4) रवीना टंडन – बॉलिवूडची मस्त मस्त गर्ल म्हणून रवीना टंडन ओळखली जाते. वयाची चाळीशी पार केलेली रवीना आजसुद्धा खूप फिट आणि सुंदर दिसते. 90च्या दशकातील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक रवीना आहे.

5) मीनाक्षी शेषाद्री – हिरो सिनेमातून मीनाक्षी नावारुपास आली होती. आपल्या सौंदर्याच्या जीवावर तिने इंडस्ट्रीत आपले वेगळे स्थान तयार केले. 90च्या दशकात मीनाक्षी सुपरहिट हिरोईन होती. परंतु एक दिवस अचानक मीनाक्षीने बॉलिवूडला रामराम ठोकला.

Visit : Policenama.com