माधुरी दीक्षितच्या मुलांकडे आहे ‘हे’ खास हुनर ; माधुरीचा मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- बॉलिवूडमधील दिग्गज आणि सौंदर्यवती अभिनेत्री माधुरी दीक्षित म्हणते की, तिच्या मुलांना या गोष्टीचा आनंद वाटतो की, ते कोणत्याही नृत्य प्रकारावर सादरीकरण करण्यास सक्षम आहेत. पुढे माधुरी सांगते की, त्यांना वयाच्या तिसऱ्या वर्षापासून नृत्याची आवड आहे. शिवाय माझ्या मुलानांही मला डान्स करताना पाहायला आवडतं. त्यांचे मित्रही म्हणतात की, तुमची मम्मी एक उत्तर डान्सर आहे.

पुढे बोलताना माधुरी म्हणते की, “माझा मुलगा येतो आणि मला म्हणतो की, आई तुला हिप हॉप माहीत आहे का? त्यावर मी त्याला के सेरा सेरा पाहायला सांगितलं. त्यानंतर तो परत आला आणि म्हणाला, वाह आता तू एक चांगली आई देखील आहे.52 वर्षांची माधुरी म्हणते की, “डान्स माझ्या आयुष्याचा एवढा मोठा हिस्सा आहे की, मी त्याच्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पनाही करु शकत नाही. शिवाय मला डान्स करणं खूप म्हणजे खूप आवडतं. मी कोठेही डान्स करू शकते.

नुकताच माधुरीचा कलंक हा सिनेमा रिलीज झाला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा चालला नाही. आपलं बजेटही हा सिनेमा वसूल करु शकला नाही. त्यावर बोलताना ती म्हणते की, तिला काही फरक पडत नाही. या सिनेमात तिच्या सोबत संजय दत्त, आलिया भट्ट, वरुण धवन यांसारखे कलाकारही प्रमुख भूमिकेत होते.

Loading...
You might also like