Madhuri Dixit – Riteish Deshmukh Dance Video | ‘धकधक गर्ल’ सोबत सुपरस्टार रितेश देशमुखनं ‘कच्चा बादाम’वर धरला ठेका, पाहा व्हायरल व्हिडिओ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Madhuri Dixit – Riteish Deshmukh Dance Video | काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘कच्चा बादाम’नं (Kacha Badam) धुमाकूळ घातला होता. हे गाणं पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीनं गायलं आहे. या गायकाचं नाव भुबन बड्याकर (Bhuban Badyakar) हे आहे. भुबन हा एक शेंगदाणा विक्रेता आहे. तो शेंगदाणा विकण्यासाठी हे गाणं म्हणून लोकांना आकर्षित करायचा. या गाण्याचा (Bhuban Badyakar – Kacha Badam Song) एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये माधुरी आणि रितेश एकत्र डान्स (Madhuri Dixit – Riteish Deshmukh Dance Video) करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर बॉलीवूडमधील धकधक गर्ल माधुरी दिक्षित (Madhuri Dixit) आणि रितेश देशमुखचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ तिनं आपल्या इंन्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ ‘द फेम गेम’ या चित्रपटाच्या सेटवरील आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये ते दोघं डान्स (Madhuri Dixit – Riteish Deshmukh Dance Video) करताना दिसत आहे. या व्हिडिओला जवळपास 9.47 लोकांनी लाईक्स दिलं असून 40 लाखांपेक्षा अधिक लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे.

 

दरम्यान, ‘द फेम गेम (The Fame Game)’ या चित्रपटामध्ये एका कलाकाराचे सगळ्यांसमोर असलेले आयुष्य आणि खरे आयुष्य कसे असते, याबद्दल दाखवलं आहे. तसेच नुकतंच माधुरीनं ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) पदार्पण केलं आहे.

 

 

 

 

 

web title : madhuri dixit shared a video of her dancing to the song kacha badam with riteish deshmukh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा