माधुरी दीक्षितनं शेअर केला खास फोटो, पूर्ण फॅमिलीसोबत घेतलीये ‘या’ गोष्टीची ट्रेनिंग !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार माधुरी दीक्षित सध्या तिच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करत आहे. अशात सोशल मीडियावरून ती चाहत्यांच्या संपर्कात आहे काही दिवसांपूर्वीच बहिणीसोबतचा थ्रोबॅक फोटो शेअर केला होता ज्यामुळं ती चर्चेत आली होती. आता तिनं पती श्रीराम नेने आणि मुलांसोबतचा एक फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यात ती पूर्ण फॅमिलीसोबतच निळ्या रंगाच्या तायक्वांदो ड्रेसमध्ये दिसत आहे. माधुरीची दोन्ही मुलं अरिन आणि रियान हातात सर्टीफिकेट घेऊन उभी आहेत.

माधुरीनं तिच्या इंस्टावरून फोटो शेअर केला आहे. या ती फॅमिलीसोबत दिसत आहे. हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा तिनं फॅमिलीसोबत तायक्वांदोची ट्रेनिंग घेतली होती. फोटो शेअर करताना माधुरी म्हणते, “ऑरेंज बेल्टसाठी आमचा टेस्टींग डे. बोर्ड तोडणं आणि तायक्वांदो शिकणं, फोकस, शिस्त, आणि मेहनतीमधील हा एक शानदार फॅमिली एक्सपेरियंस होता.”

माधुरीचा हा फोटो खूप जुना आहे. तिची मुलंही यात खूप लहान दिसत आहेत. आता मुलं खूप मोठी झाली आहेत. माधुरीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माधुरीच्या वर्कफ्रंटबद्दल सांयायचं झालं तर 1984 साली आलेल्या अबोध या सिनेमातून तिने हिंदी सिनेमात पाऊल टाकलं होतं. 1988 साली आलेल्या तेजाब या सिनेमानं तिला ओळख मिळाली. राम लखन, परिंदा, दिल, साजन, बेटा, खलनायक, हम आपके है कौन, दिल तो पागल है, देवदास यांसारख्या सिनेमात अप्रतिम अभिनय करणाऱ्या माधुरीनं हिंदी सिनेमात आपलं वेगळं स्थान तयार केलं आहे.