मुलगा ग्रॅज्युएट झाल्याने माधुरी दिक्षित जाम खुश्श, म्हणाली – ‘राम आणि माझ्यासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित Madhuri Dixit चाहत्यांच्या मनावर नेहमीच राज करते. प्रत्येकाला माधुरीच्या सौंदर्याचे कुतूहल आहे. सध्या ती जाम खुश आहे कारण तीचा लाडका लेक अरिन Arin ग्रॅज्युएट झाला आहे. माधुरीने या आनंदाच्या बातमीसह सोबत एक कुटुंबाचा सुंदर फोटोही शेअर केला आहे. यात माधुरी, पती श्रीराम नेने, मुलगा अरिन आणि लहान मुलगा रयान आहेत. राम आणि माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की अरिन हायस्कूल ग्रॅज्युएट झाला आहे. अभिनंदन अरिन आणि 2021 चा संपूर्ण टीमचेही अभिनंदन. हे वर्ष सगळ्यांसाठीच अत्यंत कठीण होत पण तुमच्या मेहनतीला, चिकाटीला, जिद्दीला आमचा सलाम असे माधुरीने म्हटले आहे.

‘पवित्र रिश्ता 2’ करण्यास उषा नाडकर्णी यांचा नकार, जाणून घ्या कारण

प्रयत्न सोडू नका़ स्वप्नांची कास धरा़ एक दिवस तुमच्यामध्ये बदल घडवण्याची ताकद असेन, असे तिने दुस-या ट्विटमध्ये म्हटले आहे. माधुरी दीक्षितचा Madhuri Dixit मोठा मुलगा अरिन Arin आता पुढच्या शिक्षणासाठी विदेशात जाणार आहे. अलीकडे माधुरीचा पती श्रीराम नेने याने पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार मानले होते, शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहिम सुरू केल्याबद्दल त्याने आदित्य ठाकरे यांना धन्यवाद दिले होते.

Also Read This : 

दिलासादायक बातमी ! कोरोनाच्या केस होताहेत कमी, 12 आठवड्यानंतर मृत्यूंचे आकडेसुद्धा घसरले

‘या’ वयात सर्वात जास्त मिळतो शरीरसुखाचा आनंद, जाणून घ्या कालावधी

‘प्रेमा’ला विरोध झाल्याने चुलत बहिण-भावाने केली ‘आत्महत्या’