हुबेहूब वडिलांसरखाच दिसतो माधुरी दीक्षितचा मुलगा, लुक्समध्ये देतोय स्टारकिड्सला ‘टक्कर’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार माधुरी दीक्षित हिनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. खास बात अशी की या व्हिडीओत तिचा मुलगाही दिसत आहे. जो तबला वादन करत आहे आणि माधुरी त्यावर थिरकत आहे.

माधुरीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात माधुरी कथ्थक करताना दिसत आहे. यात तिचा मोठा मुलगा अरिन हा तबला वाजवताना दिसत आहे. अरिन लाईमलाईटपासून कायमच दूर असतो. अनेकांनी त्याच्या बद्दल माहिती नाही.

माधुरीनं अमेरिकन सर्जन डॉक्टर श्रीराम नेने सोबत लग्न केलं. दोघांना दोन मुलं आहेत अरिन आणि रियान अशी त्यांची नावं आहेत. अरिनचा जन्म 23 मार्च 2003 साली झाला आहे. अरिन आता 17 वर्षांचा झाला आहे. लग्नानंतर 10 वर्षे माधुरी अमेरिकेतच राहिली होती. 2011 मध्ये ती कुटुंबासोबत भारतात आली होती.

अरिनबद्दल बोलायचं झालं तर त्याची हाईट असो किंवा लुक हुबेहूब श्रीराम नेने सारखा आहे. एकदा तर तो आपल्या वडिलांची काबर्न कॉपी वाटला होता. इतर स्टार्सची मुलं सोशलवर मोठ्या प्रमाणात अॅक्टीव दिसतात. परंतु माधुरीची मुलं मात्र लाईमलाईटपासून दूर राहणंच पसंत करतात.

अरिनला इंस्ट्रुमेंटचा खूप नाद आहे. काही दिवसांपूर्वीच तो पियानो वाजवताना दिसला होता. सध्या अरिन शिक्षण घेत आहे. तो शाळेतील ड्रामा किंवा नाटकात भाग घेत असतो. त्याला डान्सचीही आवड आहे. रियान बद्दल बोलायचं झालं तर तो अजून लहान आहे. तो थोडा लाजाळू टाईप आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like