‘डांस दिवाने’ मध्ये कोरोनाचा उद्रेक ! माधुरीने शोमधून घेतला ब्रेक, सुट्टीमध्ये गेली मालदीवला

पोलीसनामा ऑनलाईन टीम : महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीही कोरोनाच्या विळख्यात येण्यापासून वाचला नाही. सध्याच माधुरी दीक्षित यांचा शो डांस दिवानेच्या १४ क्रू मेंबर्सना कोरोना झाला आहे. या बातमीनंतर शोमधील बाकी सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर दुसरीकडे शोच्या जज माधुरी दीक्षित मालदीवमध्ये सुट्टीची मज्जा घेण्यासाठी गेल्या आहेत. या अभिनेत्रीने मालदीव व्हेकेशनमधून त्यांचे फोटो शेर केले आहेत.

मालदीवमधून फोटो शेर करत माधुरीने लिहले- ‘Hello from paradise”. अभिनेत्रीच्या या फोटोवरून अंदाज व्यक्त केला जाऊ शकतो की शोमध्ये वाढत असलेले कोरोनाचे प्रमाण पाहून माधुरीने शोमधून ब्रेक घेतला आहे. होळीच्या निमित्ताने माधुरीने चाहत्यांसह आभासी होळी साजरी केली. त्यांनी पती राम नेनेसोबत होळीचा थ्रोबॅक फोटो शेर केला आणि सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

माधुरीशिवाय ‘हे’ स्टार आहेत मालदीवच्या सुट्टीवर
माधुरीशिवाय दिग्दर्शक-नृत्यदिग्दर्शक फराह खान देखील मालदीवमध्ये आहेत. मालदीवमध्ये त्यांनी माधुरीचे स्वागत केले आहे. दिया मिर्झाने पती वैभव रेखा आणि मुली सोबत मालदीवच्या सुट्टीचा आनंद घेतला आहे. कुटुंबासोबत निसर्गाचा आनंद घेताना दियाने बरेच फोटो शेर केले आहेत.

शोचे क्रू मेंबर कोरंटाईन आहेत
‘डांस दिवाने’ निर्मात्यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, ”आमचा शो ‘डांस दिवाने’ शी संबंधित काही क्रू मेंबर्स कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्यांना त्वरित वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि सध्या त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. सुरक्षेसंबंधी सर्व सेफ्टी प्रोसिजर्सना लक्षात घेतले गेले आहे आणि त्या जागेला संपूर्ण सॅनिटराइज केले गेले आहे. आरोग्याची सतत नोंद घेतली जात आहे आणि ठरलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आम्ही सर्व पालन करू. या शोमध्ये माधुरी दीक्षित, तुषार कालिया, धर्मेंद्र येलांदे जज आहेत आणि राघव जुयल शोला होस्ट करतो.