आयएसआयला गोपनीय माहिती पुरवल्या प्रकरणी माधुरी गुप्ताला तीन वर्षांचा तुरुंगवास

दिल्ली : वृत्तसंस्था

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला महत्त्वाची आणि गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली भारताच्या माजी राजनयिक अधिकारी माधुरी गुप्ता यांना शनिवारी (१९ मे ) दिल्लीच्या एका न्यायालयाने ३ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजुर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

माधुरी गुप्ता परराष्ट्र सेवेमध्ये असताना पाकिस्तानच्या भारतीय दूतावासामध्ये बसून पाकसाठी काम करीत होत्या.अशी माहिती समोर आली असून जुलै २०१० मध्ये माधुरी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.माधुरी गुप्ता इस्लामाबादमधून लॅपटॉप आणि ब्लॅकबेरी फोनच्या माध्यमातून गोपनीय माहिती आयएसआयला पाठवत होत्या.आयएसआयचे दोन अधिकारी मुबशर राजा राणा आणि जमशेद यांच्याशी माधुरी या संपर्कात होत्या. तर जमशेद सोबत त्यांचे प्रेमसंबंध जुळले होते.अशी सर्व माहिती आरोपपत्रात म्हटले होते.