माधुरी म्हणत आहे ‘तबाह हो गये’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – धकधक गर्ल माधुरी दीक्षितने पुन्हा आपल्या नृत्य कौशल्याने आणि दिलखेच अंदाजाने प्रेक्षकांना घायाळ केले आहे. कलंक या चित्रपटातील गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. त्यात माधुरी दीक्षित नृत्य करताना दिसत आहे. माधुरीचा अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे.

कलंक चित्रपटातील तबाह हो गये हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. त्यात माधुरी नृत्य करताना दिसत आहे. त्यात माधुरीने केशरी रंगाचा सुरेख असा लांब बाह्यांचा पायघोळ लेहंगा घातला आहे. त्यात माधुरीचं सौंदर्य आणखीनच खुलू दिसत आहे. त्यात कलंकसाठी बनवण्यात आलेल्या भव्य सेटने भर घालत चार चांद लावले आहेत. सरोज खान आणि रेमो डिसूझा यांनी या गाण्यासाठी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. श्रेया घोषालने हे गाणं गायलं आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी हे गाणं लिहिलं असून प्रितमने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.

माधुरीचं तबाह हो गये हे गाणं पाहिल्यानंतर तिच्याच एका जुन्या भूमिकेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. देवदास चित्रपटात तिने चंद्रमुखीची भूमिका साकारली होती. तिचं तबाह हो गये हे गाणं पाहिल्यानंतर देवदासमधील चंद्रमुखी आठवल्याशिवाय राहत नाही.

दरम्यान कलंक या चित्रपटाचे अभिषेक वर्मन दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात आलिया भट्ट, वरून धवन, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संजय दत्तही या चित्रपटात झळकणार आहे. दरम्यान कलंकच्या निमित्ताने संजय दत्त आणि माधुरी दीक्षित ही जोडी खूप वर्षांनी एकत्र दिसणार आहे. कलंक हा जितका खास वाटत आहे तितकाच तो भव्य ठरताना दिसत आहे. हा चित्रपट करण जोहरच्या हृदयाच्या जवळचा चित्रपट आहे.