पर्वती विधानसभा मतदारसंघात माधुरी मिसाळ विजयी, भाजपचा किल्ला राखला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपच्या माधुरी मिसाळ विजयी झाल्या आहेत. त्यांनी 36,767 मतांनी राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांचा दारुण पराभव केला. भाजपकडून माधुरी मिसाळ यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आश्विनी कदम यांना उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात या दोन्ही उमेदवारात चुरशीची लढत सुरु होती.

आज दुपारी 1.55 मिनिटांनी माधुरी मिसाळ आणि अश्विनी कदम यांच्यात 35 हजारपेक्षा जास्त मतांचा फरक होता. माधुरी मिसाळ यांना सध्या 90 हजार 461 मते पडली तर आश्विनी कदम 55 हजार मते पडली. माधुरी मिसाळ निवडणूक निकालाच्या पहिल्या फेरीपासून आघाडीवर होत्या. सुरुवातीपासून आश्विनी कदम यांच्याबरोबर माधुरी मिसाळ यांच्यात चुरस रंगली होती.

राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत पर्वती विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या माधुरी मिसाळ यांनी 95 हजार 583 एवढी मते मिळवून विजय मिळवला होता. पर्वती विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे सचिन टावरे होते. त्यांना 26 हजार 493 मते मिळाली होती. त्यांचा 69 हजार 090 मतांनी पराभव झाला होता. पर्वती विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष जगताप, चौथ्या स्थानावर काँग्रेसचे अभय छाजेड आणि पाचव्या क्रमांकावर मनसेचे संदीप लांडगे होते.

टीप : मतदानाची आकडेवारी हि निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार देण्यात आली आहे.

1) माधुरी सतिश मिसाळ (भाजप) –  97012 मते  (विजयी उमेदवार)
2) अश्विनी नितिन कदम (राष्ट्रवादी) – 60245 मते
3) रविंद्र शरद क्षिरसागर (बहुजन समाज पार्टी) – 1391 मते
4) शतायू सिद्राम भागले (बहुजन मुक्ति पार्टी) –  1309 मते
5) ऋषीकेश मनोहर नांगरेपाटील (वंचित बहुजन अघाडी) – 7734  मते
6) संदीप भाऊशेठ सोनावणे (आम आदमी पार्टी) – 645 मते
7) करमरकर अरविंद प्रभाकर (अपक्ष) – 250 मते
8) निखिल सुनिल शिंदे (अपक्ष) – 164 मते
9) परमेश्वर दादाराव जाधव (अपक्ष) – 250 मते
10) राहूल दत्तात्रय खुडे (अपक्ष) – 899 मते
11) रोहित अशोक नारायणपेठ (अपक्ष) – 225 मते
12) NOTA –  3668 मते

Visit : Policenama.com