Madhuri Pawar | रानबाजारनंतर माधुरी दिसणार ‘या’ ऐतिहासिक चित्रपटात; साकारणार भावूक करणारी भूमिका

पोलीसनामा ऑनलाइन टीम : आपल्या अप्रतिम नृत्य कौशल्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री माधुरी पवार (Madhuri Pawar) आज घराघरात पोहोचली आहे. माधुरीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. माधुरी आता लवकरच एका ऐतिहासिक सिनेमात दिसणार आहे. छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने नाव गाजवलेली माधुरी (Madhuri Pawar) आता मोठ्या पडद्यावर आगमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच माधुरी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी मराठी हिंदीसह पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘वेडात वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

 

याआधी देखील माधुरीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात ठसे उमटवले आहेत. तर आता माधुरी या ऐतिहासिक चित्रपटात एक भावनिक भूमिका साकारणार आहे. या भूमिकेबाबत बोलताना माधुरी म्हणाली की, “दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळणे ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. एक अभिनेत्री म्हणून मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. ते एक सकारात्मक दिग्दर्शक आहेत. त्यांच्याबरोबर काम करताना खूप भारी वाटतंय. या चित्रपटात मी एक भावनिक भूमिका साकारत आहे. ते माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होते. चित्रपटातील एक दृश्य चित्रित करताना मला महेश सरांकडून शाबासकी मिळाली हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता”.

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार साकारणार आहे. या चित्रपटाची घोषणा काही दिवसांआधीच करण्यात आली होती. स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा मावळे यांच्या पराक्रमावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात लोकप्रिय मराठमोळा अभिनेता प्रवीण तरडे प्रतापरावांची भूमिका साकारणार आहे. तर बिग बॉस ३ मधील कलाकार विशाल निकम, जय दुधाणे आणि उत्कर्ष शिंदे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

माधुरीचा प्रवास खूपच थक्क करणारा आहे. आपल्या अभिनयाने आपली ओळख व्हावी अशी तिची इच्छा होती आणि त्याच पद्धतीने ती आज तिच्या अभिनयाने ओळखली जाते.
माधुरीच्या (Madhuri Pawar) वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ती ‘रानबाजार’ या वेब सिरीज मध्ये दिसली होती.
त्याआधी तिने ‘देव माणूस’ या गाजलेल्या मालिकेत देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती.
त्याचबरोबर ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत देखील ती दिसली होती.
एवढेच नाही तर ‘अप्सरा आली’ या रिअ‍ॅलिटी शोची ती विजेती देखील होती.

 

 

Web Title :- Madhuri Pawar | raanbaazaar fame madhuri pawar play historical role in
vedat marathe veer daudale saat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा