मागील ५० वर्षांत जे झाले नाही ते १५ वर्षांत झाले : नरेंद्र मोदी

भोपाळ : वृत्तसंस्था – काँग्रेसच्या नेत्यांना फक्त प्रश्न विचारण्याची सवय आहे असे वक्तव्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर पुन्हा निशाणा साधला आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी झाबुआ येथे एका प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.  काँग्रेसच्या नेत्यांना फक्त प्रश्न विचारण्याची सवय आहे. पण मध्य प्रदेशसाठी त्यांनी काय केले हे नाही सांगत असे मोदी म्हणाले.  मागील १५ वर्षांत मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे सप्ष्ट करताना,  मागील ५० वर्षांत या राज्यात जे झाले नाही. ते मागील १५ वर्षांत झाल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. इतकेच नाही तर  काँग्रेसच्या राज्यात मध्य प्रदेशमध्ये सगळीकडे अंधार पसरला होता. लोकांमध्ये फक्त निराशा होती असंही ते म्हणाले.

आम्ही विकास आणि विचार करण्याचा मार्ग बदलला आहे. आधी लोकांना अंधारात जगण्याची सवय लागली होती. इतकेच नाही तर काँग्रेसच्या काळात फक्त स्वप्ने दाखवली जात  पण आज चित्र बदलले आहे असं मोदी म्हणाले. त्यांच्या काळात कर्ज मेळावे भरत होते. पण आज लोक मुद्रा योजनेच्या माध्यमातून पुढे जात आहेत. आम्ही विकास आणि विचार करण्याचा मार्ग बदलला आहे. मागील ५० वर्षांत या राज्यात जे झाले नाही. ते मागील १५ वर्षांत झाल्याचे ते म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे मध्य प्रदेशमध्ये ज्यांनी तुम्हाला अंधारात टाकले, पुन्हा तसेच सरकार सत्तेवर यावे, असे वाटते का, असा सवाल त्यांनी केला.

काँग्रेसच्या काळात गावातील लोक रस्त्यांसाठी आसुसलेले होते. पण भाजपा सरकारने विचार करण्याची पद्धत बदलल्यानंतर मध्य प्रदेशातील या परिसरात विकासाची मोठी कामे झाली. पंतप्रधान ग्राम सडक योजनेने गावातील चित्र बदलले आहे. जे सरकार तुमच्या मुलांना त्रास देते ते काय कामाचे असे ते म्हणाले. इतकेच नाही तर आधी विकासाचा अर्थ माती टाका आणि त्याला रस्ता माना, असा होता, असा टोलाही त्यांनी लगावला. मध्य प्रदेशमध्ये २३० जागांसाठी २८ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.