17 वर्षापुर्वी बलात्कार करणार्‍याला तिनं पाहिलं Facebook वर, दाखल केला FIR

इंदौर : गेल्या वर्षी एका महिलेने एका व्यक्तीचे प्रोफाईल पाहिले. त्याला पाहून तिला आपल्यावर १७ वर्षापूर्वी ज्याने बलात्कार केला होता, तो हाच असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने तक्रार करण्याचा निर्णय घेतला. इंदूरमधील महिला पोलीस ठाण्यात १७ वर्षापूर्वी झालेल्या बलात्काराच्या आरोपावरुन एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

याबाबत या महिलेने सांगितले की तिच्यावर १७ वर्षांपूर्वी एकाने बलात्कार केला होता. मात्र, त्यावेळी त्याची काहीही माहिती नव्हती. तिला आधी त्याचे नाव माहिती नसल्यामुळे एफआयआर नोंदविता आली नाही. २०२० मध्ये तिने फेसबुकवर त्याचे प्रोफाइल पाहिले. त्यानंतर या महिलेने तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती महिला पोलीस ठाण्याच्या एसएचओ ज्योती शर्मा यांनी सांगितले.